अमळनेरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेशाचा ओघ सुरूच  असंख्य मुस्लिम नेत्यांचा झाला प्रवेश,आ.अनिल पाटलांनी केले स्वागत
1 min read

अमळनेरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेशाचा ओघ सुरूच असंख्य मुस्लिम नेत्यांचा झाला प्रवेश,आ.अनिल पाटलांनी केले स्वागत

Loading

अमळनेरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेशाचा ओघ सुरूच

असंख्य मुस्लिम नेत्यांचा झाला प्रवेश,आ.अनिल पाटलांनी केले स्वागत

अमळनेर प्रतिनिधी-येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये माजी मंत्री तथा आमदार अनिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रवेशाचा ओघ सुरूच असून नुकताच असंख्य मुस्लिम समाजाच्या नेत्यांनी उस्फुर्तपणे प्रवेश केल्याने आ.अनिल पाटील यांनी पक्षाचा फटका टाकून त्यांचे स्वागत केले.
गेल्या आठवड्यात हिंदू मुस्लिम समाजातील काही माजी नगरसेवक व सामाजिक कार्यकर्त्यांचा प्रवेश झाला होता.त्यानंतर पुन्हा ज्येष्ठ मुस्लिम नेते,माजी नगरसेवक तथा काँगेसच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. यात प्रामुख्यानं काँग्रेस नेते आमीरखा मिस्तरी, हाजी दबिरखा पठाण, माजी नगरसेवक रहेमान मेंबर,निवृत्त नायब तहसीलदार साबीर खान पठाण, तौसिफ हाजी शेखा, जफर मण्यार, साबीर पठाण, कादीर खा पठाण, फरदीन खा आदींसह अनेक मान्यवरांनी आमदार अनिल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश घेतला. सदर प्रसंगी राष्ट्रवादी शहराध्यक्ष मुख्तार खाटीक,जिल्हा उपाध्यक्ष इम्रान खाटीक , आरीफ पठाण, सैय्यद आबीद अली,कलीम शेख, इम्रान शेख आदी उपस्थित होते.आमदार पाटील यांनी यावेळी मनोगत व्यक्त करताना या निर्णयाचे कौतुक करून शहराचा विकास व समाज बांधवांच्या हितासाठी कटीबद्ध राहण्याची ग्वाही दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *