जायन्ट्स सप्ताहात अमळनेरमध्ये विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन
1 min read

जायन्ट्स सप्ताहात अमळनेरमध्ये विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन

Loading

जायन्ट्स सप्ताहात अमळनेरमध्ये विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन

अमळनेर प्रतिनिधी
जायन्ट्स सप्ताह निमित्त दि.17 ते 23 सप्टेंबर 2025 दरम्यान जायन्ट्स ग्रुप ऑफ अमळनेर ची नेत्रदीपक व समाजोपयोगी कामगिरी.सप्ताह अंतर्गत ग्रामीण भागातील गरजू व विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त समावेश करण्यावर जायंट्स ग्रूप ऑफ अमळनेर ने दिले महत्व..
जायन्ट्स वेलफेअर फाउंडेशन च्या वतीने संपूर्ण जगभरात संस्थापक अध्यक्ष स्व नाना चुडासामा यांच्या प्रेरणेतून व विश्वाअध्यक्षा श्रीमती शायना एन .सी व विश्वउपाध्यक्ष मा विजय कुमार चौधरी यांच्या नेतृत्वात जायन्ट्स वेलफेअर फाउंडेशन दरवर्षी संपूर्ण जगभरात जायन्ट्स सप्ताह चे आयोजन करीत असतो . या सप्ताहात विविध लोकोपयोगी सामाजिक, शैक्षणिक,महिला बालकल्याण, शेतकरी, आरोग्य, अनाथ आश्रम, वृद्धाश्रम यांच्यासाठी विविध उपक्रमांचा समावेश केला जातो.जायन्ट्स वेलफेअर फाउंडेशन 2 अ चे अध्यक्ष मा .श्री. किरणजी शेवाळे व जायन्ट्स सप्ताह मुख्य प्रभारी अँड संगीता पाटील यांच्या मार्गदर्शनाने जायन्ट्स ग्रुप ऑफ अंमळनेर चे संस्थापक अध्यक्ष डॉ.सुनील पंडितराव पाटील यांच्या नेतृत्वातून जायन्ट्स ग्रुप अमळनेर ने स्वखर्चातून एका इंग्रजी म्हणी प्रमाणे” Charity begins at home” गेल्या सप्ताह भरात दर्जेदार विविध सामाजिक उपक्रम राबविले.
त्यात जसे की वृक्षारोपण व संवर्धन, दंत चिकित्सा शिबिर , नेत्र रोग चिकित्सा, सांस्कृतिक कार्यक्रम गरबा प्रशिक्षण, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, ग्रामीण शाळेवर व्यक्तिमत्व विकास शिबिर, नेत्रदान विषयी जनजागृती व नेत्रदान साठी नाव नोंदणी , सेंद्रिय खते वापरा विषयी शेतकरी जागृती नोंदणी ,आनंदाश्रम वेले येथे अन्नदान, ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांना सुरूची भोजन.,, वेले वृद्धाश्रम येथे चादर वाटप, सेंद्रिय खत बनविण्याची प्रक्रिया आणि घटक विषयी शेतकरी कार्यशाळा , ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्याना टूथ पेस्ट,ब्रश वाटप इ उपक्रम घेण्यात आले.
याप्रसंगी जायन्ट्स ग्रुप अध्यक्ष डॉक्टर सुनील पाटील, उपाध्यक्ष डॉ महेश पाटील, खजिनदार राजेंद्र पाटील, रवींद्र पाटील.सचिन ओसवाल, प्रशांत पाटील उपाध्यक्ष राजेंद्र भावसार , सचिव संदीप महाजन, रमेश महाजन , संतोष वाघ, संजय मुंडके, ॲड राजेंद्र पी चौधरी, नगरसेवक जा.दीपक मनिलाल पाटील, महेश पाटील,अश्विन पाटील,भटू पाटील,प्रो. ए एम करमपूरवाला सर ,प्रो, प्रवीण भावसार सर, संजय मुंडके ,डॉ.निलेश शिंगाणे आदी सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *