सांसारिक प्रपंचा सोबतच सामाजिक जबाबदारीची जाणीव तरुण तरुणींनी ठेवावी-राजेश झाल्टे
![]()
सांसारिक प्रपंचा सोबतच सामाजिक जबाबदारीची जाणीव तरुण तरुणींनी ठेवावी.
राजेश झाल्टे
उद्यमशील, समाजशील व्यक्तिमत्त्वाच्या तरुण-तरुणींनी आपल्या संसारिकप्रपंचा सोबतच सामाजिक जबाबदारीची जाण ठेवून आपल्या योग्य जोडीदाराची निवड करताना आपलं कुटुंब समाजहित, देशहित जोपासण्यासाठी प्रयत्नशील राहून तथागत गौतम बुद्धांचा विचार आपल्या संसरीक जीवनात अनुसरावा असे मत ज्येष्ठ विधीज्ञ राजेश झाल्टे यांनी बौद्ध वधू वर परिचय मेळाव्याप्रसंगी व्यक्त केले. मुख्य अतिथी महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे अध्यक्ष मुकुंद सपकाळे यांनी आपल्या सांसारिक जीवनामध्ये प्रवेश करण्याच्या अगोदर तरुण-तरुणींनी स्वतःला शैक्षणिक प्रगत करून विचारांची परिपक्वता, सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडण्याचे मनोधैर्य भक्कम करावे असे मत मांडले. उद्घाटन उद्योजक संजय इंगळे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास प्रमुख अतिथी जयसिंग वाघ, डॉ. मिलिंद बागुल, एडवोकेट पंकज मेढे, दिलीप सपकाळे, रवींद्र इंगळे, भारती रंधे, मनीषा सुरवाडे, उमेश शिरसाठ,चंदा सुरवाडे उपस्थित होते. परिचय मेळाव्याची सुरुवात सुभाष सपकाळे व मुकेश जाधव यांनी बुद्ध वंदना व त्रिशरण पंचशीलाने केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मेळाव्याचे आयोजक चंद्रकांत सुरवाडे यांनी केले सूत्र संचलन बापूराव पानपाटील यांनी तर आभार श्रावण निकम यांनी मानले मान्यवरांचे स्वागत दीपक बनसोडे,सुभाष सपकाळे ,मुकेश जाधव प्रशांत सोनवणे,मनीष साबळे,मिलिंद साबळे ,मुन्ना भालेराव यांच्या हस्ते करण्यात आले. बौद्ध वधु वर परिचय मेळाव्यास राज्यभरातून वधू वर उपस्थित होते.

