भडणे, हातनूर, साळवे परिसरात पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान; शेतकरी हवालदिल
![]()
भडणे, हातनूर, साळवे परिसरात पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान; शेतकरी हवालदिल
शिंदखेडा प्रतिनिधी
शिंदखेडा तालुक्यातील भडणे ,हातनूर साळवे सोनसेलु वरुळ परीसरात दोन दिवसांपासून पावसाने झोडपले असुन यामुळे परीसरातील कापूस मका पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे कापूस वेचणीवर आल्याने दोन दिवसापासून पावसामुळे कापूस जमिनीवर लांबला असून सतत धार पावसामुळे कापसाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून सुरुवातीलाच यावर्षी कापसावरील लाल्याने आक्रमण केल्याने थोडाफार येणारा कापूस या दोन दिवसाच्या पाण्यामुळे खराब झाला आहे तर परिसरात मोठ्या प्रमाणात यावर्षी शेतकऱ्यांना मकाची लागवड केल्याने मका कापणीस व काढणीस आल्याने पावसामुळे मक्याचे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे असून तोंडात आलेला घास पावसाने हिरावल्याने शेतकऱ्यांपुढे मोठे आर्थिक
संकट उभे राहिले तसेच मका बाजरी इत्यादी पिके हातातून जाण्याची भीती निर्माण झाली असल्याने कधी शेतकऱ्यांना कमी पावसामुळे उत्पन्नात घडते तर कधी जास्त पावसामुळे हातात आलेला घास हिरावला जातो यामुळे शेतकरी नेहमी आर्थिक अडचणीत येत असल्याने
शेतकरी हवालदिल झाला आहे पावसामुळे गुरांचा चाराही खराब झाला आहे यामुळे शेतकऱ्यांपुढे आर्थिक संकट उभे आहे
चौकट
पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान
गेल्या वर्षी जास्त पावसामुळे खरीप हंगाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते तर अवकाळीने रब्बी हंगामाचेही
नुकसान झाले होते मात्र नव्या उमेदीने यावर्षी शेतीत पैसा खर्च टाकून यावर्षी तरी उत्पन्न येईल या उमेदीने जगणारा शेतकरीच्या पदरी नेहमी कर्जाचा डोंगर दरवर्षी वाढतो
युवराज माळी
भडणे ,,,,,,,,,,,,,

