योग्य आहार ,व्यायाम आणि वैयक्तिक स्वच्छता निरोगी जीवनाची गुरुकिल्ली- डॉ. श्रद्धा चांडक
1 min read

योग्य आहार ,व्यायाम आणि वैयक्तिक स्वच्छता निरोगी जीवनाची गुरुकिल्ली- डॉ. श्रद्धा चांडक

Loading

योग्य आहार ,व्यायाम आणि वैयक्तिक स्वच्छता निरोगी जीवनाची गुरुकिल्ली.
डॉ. श्रद्धा चांडक

जळगांव प्रतिनिधी

धावपळीच्या जीवनात दैनंदिन कामकाजात माणूस हा स्वतःला विसरत चालल्याने व कामाला अधिक महत्त्व दिल्याने सोबतच व्यसनाधीनतेकडे वळल्याने माणसाचे जीवन व्याधीग्रस्त झाले आहे, निरोगी राहण्यासाठी आणि व्याधीमुक्त होण्यासाठी योग्य आहार व्यायाम आणि वैयक्तिक स्वच्छता हीच आरोग्याची गुरुकिल्ली असल्याचे मत डॉ. श्रद्धा चांडक यांनी
सार्वजनिक विद्यालय आसोदा येथे लिनेनक्लब तर्फे कॅन्सर रोगनिदान या विषया वरिल आयोजित व्याख्याना प्रसंगी बोलताना व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शिक्षिका मंगला नारखेडे होत्या
डॉ. श्रद्धा चांडक यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना सर्वात मोठी वाढती समस्या म्हणजे कॅन्सर, हा आजार शरीरातील कोणत्याही अवयवाचा असू शकतो असे विद्यार्थ्यांना सांगितले त्यासाठी योग्य आहार आहार आणि व्यायाम वैयक्तिक स्वच्छता किती महत्त्वाची आहे यावर विद्यार्थ्यांशी संवाद साधला तसेच तंबाखू गुटखा यासारख्या व्यसनांमुळे मोठ्या प्रमाणात मुखाचा आतड्यांचा कॅन्सर पसरत आहे हे स्पष्ट करत असताना त्यांनी योग्य सवयी आणि व्यायाम किती महत्त्वाचा आहे हे सुद्धा नमूद केले. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी त्यांच्या मनामध्ये असलेल्या शंका बाबतीत संवाद साधला.प्रमुख अतिथी लीनेन क्लब अध्यक्षा
रेश्मा बेहरानी, विजूताई बाफना, रेखा वर्मा यादेखील उपस्थित होत्या.
अतिथींचे स्वागत शाळेचे मुख्याध्यापक डॉ मिलिंद बागुल यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ वृषाली चौधरी यांनी केले तर आभार हेमलता सोळंके यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *