वाहतूक पोलिस कॉन्स्टेबल योगेश सोनवणे च्या धाडसाने तरुणाचा जीव वाचला!
1 min read

वाहतूक पोलिस कॉन्स्टेबल योगेश सोनवणे च्या धाडसाने तरुणाचा जीव वाचला!

Loading

वाहतूक पोलिस कॉन्स्टेबल योगेश सोनवणे च्या धाडसाने तरुणाचा जीव वाचला!

ठाणे:कल्याण (मनिलाल शिंपी)
कल्याण शहर वाहतूक पोलीस दलातील कर्तव्यनिष्ठ वाहतूक पोलिस कॉन्स्टेबल योगेश एकनाथ सोनवणे (८२६१) अंबरनाथ शहर आयटीआय कॉलेज परिसरात घडलेल्या घटनेत एका तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला होता. मानेवर मोठा घाव झाला होता. रक्तबंबाळ अवस्थेत युवक पडला होता. त्याच वेळी महामार्गावरून जात असताना त्यांनी पाहिले व क्षणाचाही विलंब न करता रक्तबंबाळ अवस्थेत त्या तरुणांना आपल्या गाडीत टाकून उल्हासनगर मधील शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्यामुळेच त्या तरुणाचे प्राण वाचले.वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले की, योग्य वेळी उपचार मिळाल्यामुळे त्याचा जीव वाचू शकला.वाहतूक पोलिसांच्या तत्परतेमुळे एका तरुणाचा जीव वाचला. ही बाब पोलिसांसाठी अभिमानाची आहे.
त्यामुळे ठाणे शहर वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त श्री. पंकज शिरसाठ यांनी
कल्याण शहर वाहतूक पोलीस दलातील कर्तव्यनिष्ठ वाहतूक पोलिस कॉन्स्टेबल योगेश एकनाथ सोनवणे (८२६१) यांच्या धाडसी आणि मानवतावादी कार्याचे मनापासून कौतुक केले आहे. “फक्त वाहतूक नियंत्रणच नाही तर जीव वाचविण्याचे कामही पोलिस करत आहेत, याचा आम्हाला अभिमान वाटतो,” असे त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *