निंब गावच्या नवरात्रोत्सवात नंददीप विद्यालयाच्या विद्यार्थिनींचे नेत्रदीपक लेझीम नृत्य अविस्मरणीय ठरले
![]()
निंब गावच्या नवरात्रोत्सवात नंददीप विद्यालयाच्या विद्यार्थिनींचे नेत्रदीपक लेझीम नृत्य अविस्मरणीय ठरले..
निंब प्रतिनिधी: श्रद्धा, भक्ती आणि जल्लोषाचा मिलाफ घडवणारा देवी मातेच्या आगमनाचा सोहळा नवरात्रोत्सवानिमित्त निंब गावात उत्साहात पार पडला. शिवनेरी मित्र मंडळाच्या वतीने झालेल्या या सोहळ्याची सुरुवात डोळे दिपवणाऱ्या, आकाश उजळून टाकणाऱ्या फटाक्यांच्या आतषबाजीने झाली. संपूर्ण गावाचे वातावरण एक क्षणासाठी मंगलमय आणि अलौकिक भासू लागले.
या प्रसंगी नंददीप माध्यमिक विद्यालयाच्या कन्या विद्यार्थिनींनी लेझीम नृत्याच्या तालावर मंत्रमुग्ध करणारे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. श्री. विलास पाटील (आबा) यांच्या मार्गदर्शनाखाली, व्ही. एम. चौधरी सर यांच्या सहकार्याने व मुख्याध्यापक ए. बी. चौधरी, शिंगाणे सर, श्री. आर. आर. पाटील व भोलेनाथ चौधरी (आबा) यांच्या देखरेखीखाली हे नेत्रदीपक सादरीकरण घडले. विद्यार्थिनींनी चौफेर गोल करून वाजवलेल्या लेझीमच्या तालावर संपूर्ण परिसर थिरकला.
गावकरी, महिला-भगिनी, शिवनेरी मित्र मंडळाचे सदस्य आणि उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थिनींच्या उत्स्फूर्त सादरीकरणाला भरभरून दाद दिली.
“आजचा दिवस आमच्या विद्यार्थ्यांसाठी आयुष्यभर लक्षात राहील असा ठरला. गावकऱ्यांसमोर प्रेम आणि सेवाभावातून लेझीम नृत्य सादर करण्याची संधी दिल्याबद्दल आम्ही शिवनेरी मित्र मंडळाचे मनःपूर्वक आभारी आहोत,” असे शाळेचे मुख्याध्यापक ए. बी. चौधरी यांनी सांगितले.
👉

