मोहाडी प्र. डांगरी येथे सेवा पंधरवाडा उत्साहात सुरू – शिव रस्त्यांचे चावडीवाचन व वृक्षारोपणाने कार्यक्रमाला प्रारंभ
1 min read

मोहाडी प्र. डांगरी येथे सेवा पंधरवाडा उत्साहात सुरू – शिव रस्त्यांचे चावडीवाचन व वृक्षारोपणाने कार्यक्रमाला प्रारंभ

Loading

मोहाडी प्र.डांगरी (वार्ताहर):

धुळे तालुक्यातील मोहाडी प्र.डांगरी येथे नुकताच छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत सेवा पंधरवाडा जिल्हाधिकारी धुळे , उपविभागीय अधिकारी धुळे , तहसीलदार धुळे ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल मंडळ न्ह्याहळोद अंतर्गत मौजे मोहाडी प्र.डांगरी येथे दिनांक १७ सप्टेंबर २०२५ ते २आक्टोंबर २०२५ दरम्यान सेवा पंधरवाड्याचे उदघाटन करण्यात आले आहे.
त्यात मौजे मोहाडी शिवारातील शिव रस्ते,नकाशावरील रस्ते, तसेच गाव नकाशावर नसलेल्या रस्त्यांचे चावडीवाचन करण्यात आले. व पाणंद रस्त्यांविषयी मोहिमेचा पहिल्या टप्प्याची माहिती ग्रामस्थांना ग्राम महसूल अधिकारी उज्वला बिरारीस यांनी सविस्तर वाचवून दाखवली.
सदर शिव रस्त्यांच्या भेटीच्या वेळी वृक्षारोपण ही करण्यात आले.
सदर कार्यक्रमासाठी
उप सरपंच विलास गुजर, संजय खैरनार, हिम्मत पाटील,ग्राम महसूल सेवक विजय धनगर , रावसाहेब सूर्यवंशी, आबा नांद्रे ,महेंद्र अहिरराव, नामदेव पाटील, संजय सूर्यवंशी, योगेश सूर्यवंशी तसेच ग्रामस्थ हे मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *