श्री मंगळग्रह सेवा संस्थेच्या मोफत शिबिरातून रुग्णांना डोळ्यांचा प्रकाश*
1 min read

श्री मंगळग्रह सेवा संस्थेच्या मोफत शिबिरातून रुग्णांना डोळ्यांचा प्रकाश*

Loading

*श्री मंगळग्रह सेवा संस्थेच्या मोफत शिबिरातून रुग्णांना डोळ्यांचा प्रकाश*

अमळनेर प्रतिनिधी: धार्मिकतेसोबत सामाजिक बांधिलकी जपत येथील श्री मंगळग्रह सेवा संस्था यांच्या पुढाकाराने आणि ना. गुलाबरावजी पाटील सोशल फाउंडेशन, पाळधी, संकल्प सेवा फाउंडेशन, धनवाडी तसेच आर. झुणझुणवाला शंकरा आय हॉस्पिटल, पनवेल यांच्या सहकार्याने रविवारी (दि. २१) मोफत मोतीबिंदू तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या शिबिरात अमळनेर, धुळे, चोपडा, जळगाव, एरंडोलसह तालुक्यातील ग्रामीण भागातून तब्बल ८४ रुग्णांनी सहभाग नोंदविला. त्यापैकी ४६ रुग्ण मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी पात्र ठरले असून, त्यांना तत्काळ पनवेल येथील आर. झुणझुणवाला शंकरा आय हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी रवाना करण्यात आले.
शिबिराचे उद्घाटन सकाळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. रुग्णांची तपासणी डॉ. राहुल चौधरी डॉ. गौरव तायडे (नेत्ररोग तज्ज्ञ, शंकरा आय हॉस्पिटल, पनवेल) यांनी केली. कॅम्पचे मुख्य संयोजक भूपेंद्र तरवाघ, प्रशांत कोळी आणि अरुण पारधी यांनी शिबिरात महत्त्वाची भूमिका निभावली.
रुग्णांना पनवेल येथे सुरक्षितरीत्या पोहोचवण्यासाठी त्वरित वाहन व्यवस्था करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंगळग्रह सेवा संस्थेचे उपाध्यक्ष एस. एन. पाटील यांनी केले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी जनसंपर्क अधिकारी शरद कुलकर्णी, रजनीकांत पाटील, अजय पाटील, नितेश बारी, प्रमोद पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *