त्र्यंबकेश्वरमध्ये पत्रकारांवर जीवघेणा हल्ला; एक गंभीर जखमी, मंत्री भुजबळांकडून दखल;कठोर कारवाईच्या पोलिसांना सूचना; पोलिसांकडून संबंधितांची धरपकड सुरू*
1 min read

त्र्यंबकेश्वरमध्ये पत्रकारांवर जीवघेणा हल्ला; एक गंभीर जखमी, मंत्री भुजबळांकडून दखल;कठोर कारवाईच्या पोलिसांना सूचना; पोलिसांकडून संबंधितांची धरपकड सुरू*

Loading

*त्र्यंबकेश्वरमध्ये पत्रकारांवर जीवघेणा हल्ला; एक गंभीर जखमी, मंत्री भुजबळांकडून दखल;कठोर कारवाईच्या पोलिसांना सूचना; पोलिसांकडून संबंधितांची धरपकड सुरू*

नाशिक प्रतिनिधी

आगामी सिंहस्थ कुंभमेळा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर शनिवारी त्र्यंबकेश्वर येथे साधू-महंतांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीचे वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या पत्रकारांवर स्वामी समर्थ कमानीजवळ चार ते पाच जणांच्या टोळक्याने अचानक हल्ला चढवून जब्बर मारहाण केली. या घटनेमुळे पत्रकार संघटनांसह विविध स्तरांतून तीव्र संताप व्यक्त होत असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे.

या हल्ल्यात पत्रकार किरण ताजणे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना त्र्यंबकेश्वर येथील जिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी अपोलो रुग्णालयात हलविण्यात आले. तसेच इतर दोन पत्रकार किरकोळ जखमी असून त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या प्रकरणी मंत्री छगन भुजबळ यांनी तात्काळ दखल घेतली असून, दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. दरम्यान, स्थानिक पोलिसांनी आरोपींच्या शोधासाठी मोहीम हाती घेतली असून संबंधितांची धरपकड सुरू आहे.

पत्रकारांवर झालेल्या या हल्ल्यामुळे सिंहस्थाच्या सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर प्रश्न निर्माण झाले असून, भविष्यात अशा घटना होऊ नयेत यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलण्याची मागणी होत आहे.

*महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी वृत्त संकलन विभाग नाशिक*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *