ब्रह्माकुमारिज तर्फे संध्याछाया वूद्धाश्रमातील बंधू..भगिनीचा सत्कार*…‌‌‍‌
1 min read

ब्रह्माकुमारिज तर्फे संध्याछाया वूद्धाश्रमातील बंधू..भगिनीचा सत्कार*…‌‌‍‌

Loading

*ब्रह्माकुमारिज तर्फे संध्याछाया वूद्धाश्रमातील बंधू..भगिनीचा सत्कार*…‌‌‍‌

.( नांदेड प्रतिनिधी ) दि.20 सप्टेंबर 2025 रोजी ब्रह्माकुमारिज सुखमणी फरांदे पार्क येथील सेवा केंद्र मध्ये आध्यत्मिक राजयोग सेवा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमास वसंत नगर सेंटरच्या जेष्ठ राजयोगीनी ब्रह्माकुमारिज स्वाती दिदिजी, फरांदे पार्कच्या बि.के. अनिता दिदी ,बि.के वंदना दिदि , व बि.के.योगीनी दिदि यांची प्रमुख उपस्थिती होती . कार्यक्रमांचे प्रास्ताविक बि.के.अनिता दिदि यांनी केले.संध्याछाया या आश्रमात भाऊ..बहीनीचा आध्यत्मिक कोर्स संपन्न झाल्याचे सांगितले.या कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थितीत जेष्ठ राजयोगीनी ब्रह्माकुमारिज स्वाती दिदिजी यांनी परमपिता परमात्मा च्या जवळ जाण्याचा मार्ग राजयोगाच्या ज्ञानातुन प्राप्त होतो असे प्रतिपादन दिदिनी केले.आणि याच राजयोगातुन आपणा सर्वाना आनंद, खुशी व समाधान मिळते असे आपले मत व्यक्त केले.या कार्यक्रमास उपस्थित भाऊ..बहीनीचा ईश्वरीय सौगात देऊन स्वागत व सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला .या कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन प्रा.डाॅ.सौ.कल्पना जाधव यांनी केले या कार्यक्रमास फरांदे पार्क व परिसरातील ब्रह्माकुमारिज परिवार मोठ्या संख्येने उपस्थिती होती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *