युवा समिती भोरगाव लेवा पाटीदार पंचायत कल्याण शहर कार्यकारिणीची स्थापना*
1 min read

युवा समिती भोरगाव लेवा पाटीदार पंचायत कल्याण शहर कार्यकारिणीची स्थापना*

Loading

*युवा समिती भोरगाव लेवा पाटीदार पंचायत कल्याण शहर कार्यकारिणीची स्थापना*

 

कल्याण, २१ सप्टेंबर: येथील लेवा पाटीदार समाज मंडळाच्या सभागृहात आज, रविवारी, २१ सप्टेंबर रोजी भोरगाव लेवा पाटीदार पंचायतच्या कल्याण शहर युवा समितीच्या नवीन कार्यकारिणीची स्थापना करण्यात आली. या सभेच्या अध्यक्षस्थानी लेवा मंडळाचे कार्याध्यक्ष श्री. युवराज चौधरी होते.

समाजातील सुमारे २५ तरुणांच्या उपस्थितीत झालेल्या या सभेत युवा समितीच्या अध्यक्षपदी श्री. योगेश चौधरी यांची एकमताने निवड करण्यात आली. तसेच कार्याध्यक्ष म्हणून श्री. दीपक चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून युवा समिती प्रमुख श्री. मयुरेश नरेंद्र कोल्हे, जिल्हा सदस्य श्री. राकेश इंगळे, श्री. तुषार लिलाधर चौधरी, अंबरनाथ शहर समितीचे श्री. किरण नेमाडे, श्री. प्रशांत पाटील, आणि श्री. नीलेश झांबरे उपस्थित होते.

नवनिर्वाचित कार्यकारिणी पुढीलप्रमाणे:

अध्यक्ष: श्री. योगेश चौधरी

कार्याध्यक्ष: श्री. दीपक चौधरी

सहकार्याध्यक्ष: श्री. तुषार भारंबे

उपाध्यक्ष: श्री. सागर बोंडे, सौ. विना नेमाडे

सचिव: श्री. विनय धांडे

सहसचिव: श्री. किरण पाचपांडे, श्री. पंकज जावळे.

खजिनदार: श्री. दीपक भारंबे

सदस्य: श्री. निनू झोपे, श्री. रोहन इंगळे, श्री. मोहन महाजन, श्री. अमोल खडके

महिला सदस्य: सौ. विजया पाटील, सौ. अश्विनी पाटील, सौ. मोनाली राणे

सल्लागार सदस्य: श्री. राकेश इंगळे

कायदेशीर सल्लागार: ॲड. सोनल बऱ्हाटे

नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे कुटुंबनायक श्री. ललित दादा पाटील, युवा समिती प्रमुख श्री. मयुरेश नरेंद्र कोल्हे आणि समस्त भोरगाव लेवा पाटीदार पंचायत ठाया पाडळसे सदस्यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.

यावेळी भोरगाव समिती मुंबई विभाग सचिव सौ. भाग्यश्री पाचपांडे यांनी दूरध्वनीवरून नवनिर्वाचित कार्यकारिणीशी संवाद साधून त्यांना शुभेच्छा दिल्या. या निवडीमुळे तरुणांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, समाजाच्या विकासासाठी नवीन कार्यकारिणी कटिबद्ध असल्याचे मत तसेच समाज मंडळ कल्याण सोबत संलग्न युवा समिती कार्यरत असणार असल्याचे नवनिर्वाचित अध्यक्षांनी व्यक्त केले..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *