दहिवद ग्रामपंचायतीत ‘माझं गाव माझा अभिमान – मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा’ शुभारंभ
1 min read

दहिवद ग्रामपंचायतीत ‘माझं गाव माझा अभिमान – मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा’ शुभारंभ

Loading

दहिवद ग्रामपंचायतीत ‘माझं गाव माझा अभिमान – मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा’ शुभारंभ

अमळनेर तालुका प्रतिनिधी –
जळगाव जिल्ह्यातील दहिवद ग्रामपंचायतीत “माझं गाव माझा अभिमान – मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा” शुभारंभ सोहळा मोठ्या उत्साहात व ग्रामसभेच्या माध्यमातून पार पडला.
या वेळी प्रथम लोकनियुक्त सरपंच सौ. सुषमाताई देसले पाटील यांच्या उपस्थित व ग्रामपंचायत प्रशासक श्री. कठुडे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा घेण्यात आली. कार्यक्रमास ग्रामपंचायतीचे मान्यवर सदस्य, उपसरपंच, पदाधिकारी, तलाठी आप्पा, शाळेचे मुख्याध्यापक, सी.आर.पी., बचत गटातील महिला, अंगणवाडी सेविका व मदतनीस, आशा सेवक, आशा वर्कर तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी  ग्रामविकास अधिकारी श्री. शेखर धनगर यांची विशेष उपस्थिती लाभली. या अभियानांतर्गत गावाच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामस्थांचा सहभाग महत्त्वाचा असल्याचे मान्यवरांनी आपल्या भाषणातून सांगितले.
कार्यक्रमाचे औचित्य साधून वृक्षारोपण करण्यात आले. “माझं गाव माझा अभिमान आहे, व या अभियानात सक्रिय सहभाग घेऊन मी माझं गाव समृद्ध बनवणार आहे,” असे सरपंच सौ. सुषमाताई देसले पाटील यांनी ग्रामस्थांना आवाहन केले.
यामुळे ग्रामविकासाची नवी ऊर्जा व जिद्द दहिवद ग्रामपंचायतीला लाभेल, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *