नाट्यकलेतून महिलांचा आत्मविश्वास – अमळनेरात यशस्वी तीन दिवसीय शिबीर,   परिवर्तन व महिला मंच ट्रस्टतर्फे अविस्मरणीय नाट्य शिबीराची सांगता
1 min read

नाट्यकलेतून महिलांचा आत्मविश्वास – अमळनेरात यशस्वी तीन दिवसीय शिबीर, परिवर्तन व महिला मंच ट्रस्टतर्फे अविस्मरणीय नाट्य शिबीराची सांगता

Loading

नाट्यकलेतून महिलांचा आत्मविश्वास – अमळनेरात यशस्वी तीन दिवसीय शिबीर

परिवर्तन व महिला मंच ट्रस्टतर्फे अविस्मरणीय नाट्य शिबीराची सांगता

अमळनेर-परिवर्तन जळगांव आणि अमळनेर महिला मंच ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसीय नाट्य शिबीर दि.-18 सप्टेंबर ते दिनांक.-20 सप्टेंबर 2025 अखेर जुना टाऊन हॉल, लोकमान्य शाळेजवळ, येथे आयोजित केले होते.शिबीराची सांगता जि. प. सदस्या जयश्रीताई अनिल पाटील यांच्या उपस्थितीत झाली.याप्रसंगी परिवर्तनच्या अंजली पाटील यांनी मदर मेरी ची भूमिका चपखलपणे साकारली.नारायण बाविस्कर यांनी कीर्तन सादर केले.नाट्यकर्मी शंभू पाटील आणि जयश्री पाटील यांनी ‘अमृता साहिर इमरोज’ या नाटकातील अमृता व इमरोज चा संवाद सादर केला. हर्षल पाटील यांनी ‘नली’या नाटकातील निवडक संवाद सादर केले. अक्षय नेहे यांनी खेळातून नाटक कसे साकारते याबद्दल मार्गदर्शन केले. तीन दिवसात शिबीरार्थी महिलांनी विविध भूमिका साकारल्या.मन, बुद्धी,शरीर तंदुरूस्त असेल तर आपण नाटकाला न्याय देऊ शकतो.पाठांतर, हावभाव याबद्दलही मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन शिबीर प्रमुख वसुंधरा लांडगे यांनी केले.
याप्रसंगी मंचच्या अध्यक्षा डाॅ. अपर्णा मुठे,उपाध्यक्ष-तिलोत्तमा पाटील,सेक्रेटरी-सरोज भांडारकर, कोषाध्यक्ष-कांचन शहा, सदस्या पद्मजा पाटील, माधुरी पाटील,करूणा सोनार, शीला पाटील, उज्वला शिरोडे व साने गुरूजी वाचनालयाचे अध्यक्ष दिलीप सोनवणे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *