भाजप जिल्हाध्यक्षांची गुंडगिरी उघड! शुभांगीताई पाटील यांनी केला जाहीर निषेध; स्टुडंट्स असोसिएशनचा इशारा – “रस्त्यावर उतरू”!
![]()
—भाजप जिल्हाध्यक्षांची गुंडगिरी उघड! शुभांगीताई पाटील यांनी केला जाहीर निषेध; स्टुडंट्स असोसिएशनचा इशारा – “रस्त्यावर उतरू”!
अमळनेर प्रतिनिधी :
धुळे जिल्हा राजकारणात चांगलाच भूचाल घडवणारी घटना समोर आली आहे. ठाकरे गटाच्या महिला प्रमुख शुभांगीताई पाटील आणि त्यांच्या पती यांना भाजी विक्रेत्यांच्या बैठकीत लक्ष्य करून भाजप जिल्हाध्यक्ष धावून गेले, ही घटना लोकशाहीवर काळा डाग असल्याची टीका विरोधकांनी केली आहे.
या प्रकाराने संतप्त झालेल्या शुभांगीताई पाटील यांनी तात्काळ निषेध नोंदवत भाजप जिल्हाध्यक्षांचा जाब मागितला. दरम्यान महाराष्ट्र राज्य स्टुडंट्स असोसिएशनचे जळगाव जिल्हा अध्यक्ष दीपक सुर्यवंशी यांनी थेट इशारा देत म्हटले की,
“लोकशाहीच्या नावाखाली गुंडगिरी करणाऱ्यांना महाराष्ट्राची जनता ओळखून आहे. आम्ही सत्याचा माज दाखवून कोणालाही दडपशाही करू देणार नाही. भाजप जिल्हाध्यक्षांनी ताबडतोब सार्वजनिक माफी मागावी, अन्यथा असोसिएशन रस्त्यावर उतरून निर्णायक लढा देईल.”
तसेच जिल्हा परिषदेसाठीचे उमेदवार आणि असोसिएशनचे जिल्हा अध्यक्ष दिपक पाटील यांनी संताप व्यक्त करत स्पष्ट शब्दांत सांगितले की,
“हा प्रकार म्हणजे महिलांचा अवमान आहे. अशा हलकट राजकारणाला आम्ही कधीच झुकणार नाही. जर कार्यवाही झाली नाही, तर महाराष्ट्र राज्य स्टुडंट्स असोसिएशन आक्रमक पवित्रा घेईल आणि जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात भाजपच्या गुंडशाहीविरोधात मोर्चे उभारले जातील.”
या घटनेनंतर भाजप जिल्हाध्यक्षांचे राजकीय अस्तित्व धोक्यात येऊ शकते, अशी चर्चा जिल्ह्यात सुरू झाली आहे. कार्यकर्त्यांमध्ये रोष असून, वातावरण तापले आहे. आता भाजपकडून या गंभीर प्रकरणावर काय भूमिका घेतली जाते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
चौकट
काल धुळ्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात
शिक्षक नेत्या मा.सौ. शुभांगीताई पाटील यांच्यावर भारतीय जनता पार्टीचे माजी नगरसेवक हिरामण गवळी व गजेंद्र अंपाळकर
यांनी केलेला भ्याड हल्ला व दहशतीचा निंदनीय प्रकार आहे.
महाराष्ट्र टीचर्स असोसिएशनच्या वतीने
राज्यातील सर्व शिक्षकांच्या वतीने तीव्र शब्दांत निषेध!

