के. एल. पोंदा हायस्कूलमध्ये हिंदी दिवसाचा उत्साह – विविध उपक्रमांनी शाळा रंगली हिंदीमय!
1 min read

के. एल. पोंदा हायस्कूलमध्ये हिंदी दिवसाचा उत्साह – विविध उपक्रमांनी शाळा रंगली हिंदीमय!

Loading

*के.एल.पोंदा.हायस्कूल, येथे हिंदी दिवस मोठ्या उत्साहात साजरा!*

मुंबई प्रतिनिधी

दि डहाणू एज्यूकेशन ट्रस्ट संचलित, शाळा के.एल.पोंदा.हायस्कूल, डहाणू येथे हिंदी दिवस दिनांक १५/९/२०२५रोजी,मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांना ग्रीटिंग कार्ड,गुलाब पुष्प,व पेन देऊन स्वागत केले.तसेच प्रतिमा पूजन, दिपप्रज्वलन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे आयोजन, नियोजन, सूत्रसंचलन, शाळेच्या उपक्रमशील , आदर्श शिक्षिका सौ.अनुपमा जाधव यांनी केले.
त्यांनी आपल्या प्रास्ताविकातून हिंदी भाषेचे महत्त्व सांगितले.तसेच हिंदी भाषा दिनाचे महत्त्व आहेच. तसेच आपल्या मातृभाषाला देखील महत्त्व द्यावे. सोबत मराठी भाषा असो की, इंग्रजी इतर भाषांवर देखील आदरभाव ठेवला पाहिजे.कारण मराठी, हिंदी, इंग्रजी या त्रिभाषा आहेत.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक मा.सोपानजी इंगळे सर, यांनी या कार्यक्रमात सहभागी झालेल्यांचे कौतुक करुन आनंद व्यक्त केला.
हिंदी दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. व विद्यार्थ्यांच्या गुणांचे कौतुक केले.उपमुख्याध्यापिका सौ.रसिका घागस मॅडम
पर्यवेक्षक यांनी देखील शुभेच्छा दिल्या.मा.सुनिल मोरे सर यांनी देखील अनमोल मार्गदर्शन केले.तसेच पर्यवेक्षिका मा.सौ.मनिषा पटेल मॅडम यांनी विद्यार्थ्यांना हिंदी दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. सौ.शीला सुरती मॅडम,श्री . रोहन सर उपस्थित होते. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता.

हिंदी दिनानिमित्त हिंदी विषय शिकवणाऱ्या सर्व शिक्षकांचा मा . प्राचार्य श्री.सोपानजी इंगळे सर यांच्या हस्ते गुलाब पुष्प व पेन देऊन सन्मान करण्यात आला.
तसेच इयत्ता ५वी ते १०वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबविण्यात आले. यात वकृत्व ,निबंध लेखन, कहानी लेखन,,ग्रिटींग कार्ड तयार करणे, कविता गायन, देशभक्तीपर गीत, समुह गायन अतिशय सुंदर रितीने हिंदीमय वातावरण निर्माण झाले.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री. रोहन सरांनी छान मानले. तर फलक लेखन श्री.सुनिल कडू सर
यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *