कल्याण-डोंबिवली जिल्हास्तरीय शालेय जलतरण स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद.
![]()
कल्याण-डोंबिवली जिल्हास्तरीय शालेय जलतरण स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद.
कृष्णा बनगर, कृष्णा माळी,विजय सिंग व सर्व क्रीडासमिती सदस्य व क्रीडा संघटना यांचा विशेष सहकार्यामुळे शालेय क्रीडा स्पर्धा यशस्वी होत आहेत.: क्रीडा पर्यवेक्षक प्रविण कांबळे.
ठाणे: कल्याण( मनिलाल शिंपी)कल्याण डोंबिवली महानगरपालिका आणि ठाणे जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमानाने 2025-26 या वर्षासाठीची जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धा ऑलिंपिक स्पोर्ट्स सेंटर, लेकशोर ग्रीन जलतरण तलाव,कटाई बदलापूर रोड,खोणी पलावा, डोंबिवली (पूर्व) येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या स्पर्धेचे नियोजन रूपाली रेपाळे स्पोर्ट्स अकॅडमीमार्फत करण्यात आले होते.
खेळ प्रमुख म्हणून श्री कृष्णा बनगर यांनी स्पर्धेचे उत्कृष्टपणे संयोजन केले. त्यांच्या नेतृत्वाखाली ही स्पर्धा अत्यंत यशस्वीरित्या पार पडली. रूपाली रेपाळे आणि अनिरुद्ध महाडिक यांनी पंच म्हणून आपली जबाबदारी पार पाडली.
स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी अनेक मान्यवर उपस्थित होते. यात कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे क्रीडा पर्यवेक्षक श्री प्रवीण कांबळे, कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्रीडा समिती सदस्य श्री सुनील पाटील, श्री कृष्णा माळी, के.एम. अग्रवाल कॉलेजचे फिजिकल डायरेक्टर विजयसिंग यांचा समावेश होता. तसेच, योगेश शिंदे , अतिश ठाणगे, महेश जंगम, राम निंबाळकर, योगेश सावंत, वैशाली शिंदे, गीतांजली गायकर आणि इतर अनेक क्रीडा शिक्षक उपस्थित राहून खेळाडूंना प्रोत्साहन दिले.
कार्यक्रमाच्या शेवटी, खेळ प्रमुख श्री कृष्णा बनगर यांनी उपस्थित सर्व मान्यवर, खेळाडू, आयोजक आणि स्वयंसेवकांचे आभार मानले. ही स्पर्धा डोंबिवलीतील क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन देणारी ठरली, असे मत अनेकांनी व्यक्त केले.

