इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालयाचे मुले निबंध स्पर्धेत चमकले
1 min read

इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालयाचे मुले निबंध स्पर्धेत चमकले

Loading

​ इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालयाचे मुले निबंध स्पर्धेत चमकले

धरणगाव, १६ सप्टेंबर : इंदिरा गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, धरणगाव] ( टाटा बिल्डींग इंडिया तर्फे)यांच्या वतीने आयोजित आंतरशालेय निबंध स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ” आत्मनिर्भर भारत” या विषयावर आधारित ही स्पर्धा पार पडली.
​स्पर्धेमध्ये शाळेतील सुमारे 90 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांना त्यांच्या कल्पनाशक्तीला आणि विचारशक्तीला चालना देण्यासाठी हा एक उत्तम मंच ठरला. अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या निबंधातून पर्यावरण, तंत्रज्ञान आणि सामाजिक मूल्यांवर प्रभावी विचार मांडले.
​या स्पर्धेचे उद्घाटन मुख्याध्यापिका एस एस पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. आपल्या भाषणात त्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले आणि लेखन कलेचे महत्त्व सांगितले. स्पर्धेचे परीक्षण बी पी पाटील यांनी केले.
​स्पर्धेतील विजेते:
*🖊️मोठा गट*🖊️
*प्रथम*-आकांक्षा मंगल गुंजाळ(१०वीअ)
*द्वितीय*- प्रविणा बापु महाजन(१० वी अ )
*तृतीय*- मिलिंद निवृत्ती कोल्हे(१० वी अ)
*उत्तेजनार्थ*- भाग्यश्री मुरलीधर पाटील(१० वी अ )

🖊️ *लहान गट*🖊️
*प्रथम*- तन्वी अमोल धनगर (८ वी अ )
**द्वितीय* – तेजस धनराज सोनवणे (८ वी अ )
**तृतीय*- अनुज नाना महाजन ( ८ वी अ )

​याव्यतिरिक्त, उत्तेजनार्थ पारितोषिके देखील प्रदान करण्यात आली. सर्व विजेत्यांना संस्थेचे सचिव सी. के. पाटील यांच्या हस्ते प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह पदक देऊन गौरवण्यात आले.
आरती महाजन यांनी स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी सर्वांचे आभार मानले. अशा स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना वाव मिळतो आणि त्यांना भविष्यातील आव्हानांसाठी तयार होण्यास मदत होते, असे ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *