पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देवगाव देवळी हायस्कूलमध्ये निबंध स्पर्धा
1 min read

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देवगाव देवळी हायस्कूलमध्ये निबंध स्पर्धा

Loading

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देवगाव देवळी हायस्कूलमध्ये निबंध स्पर्धा

 

खासदार स्मिताताई वाघ, भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष भैरवीताई वाघ-पलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली, शहराध्यक्ष योगेश गोविंदा महाजन यांच्या सौजन्याने विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

 

अमळनेर प्रतिनिधी) :
दिनांक १७ सप्टेंबर रोजी पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. त्याचाच एक भाग म्हणून खासदार स्मिताताई वाघ ,
भारतीय जनता युवा मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्ष भैरवीताई वाघ पलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली व भारतीय जनता पार्टी अमळनेर शहराध्यक्ष योगेश गोविंदा महाजन यांच्या सौजन्याने महात्मा जोतीराव फुले हायस्कूल, देवगाव (ता. अमळनेर) येथे निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
या स्पर्धेत इयत्ता आठवी ते दहावीतील विद्यार्थ्यांना ७ वेगवेगळे व महत्त्वपूर्ण विषय देण्यात आले होते. त्यामध्ये –
१) आत्मनिर्भर भारत : स्वप्न ते वास्तव
२) पर्यावरण संवर्धन : आजची आवश्यकता
३) जागतिकीकरण
४) ऑपरेशन सिंदूर – राष्ट्रीय सुरक्षा
५) राष्ट्र प्रथम : भारतीय युवकांची भूमिका
६) आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे स्थान
७) दहशतवाद : भारताची भूमिका

विद्यार्थ्यांनी यापैकी कोणत्याही एका विषयावर ३०० ते ४०० शब्दांमध्ये निबंध लिहिणे आवश्यक होते. सर्व निबंध फुलस्केप कागदावर लिहिण्याची अट ठेवण्यात आली होती. स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पहिल्या पाच विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यात येणार असल्याचे स्पर्धा प्रमुख ईश्वर आर. महाजन यांनी सांगितले.

शाळेतील आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी निबंध स्पर्धेला उस्फुर्त प्रतिसाद दिला..
शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन यांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करताना शहराध्यक्ष योगेश महाजन यांच्या पुढाकाराचे अभिनंदन केले. तसेच विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीयता, आत्मनिर्भरता व सामाजिक भान जागविण्यासाठी अशा स्पर्धा अत्यंत उपयुक्त ठरतात, असेही त्यांनी मत व्यक्त केले.
यावेळी शाळेतील शिक्षक एस के महाजन,एच.ओ.माळी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *