महाराष्ट्र राज्यातील बाल सुरक्षा विषयावर कार्यरत स्वयंसेवी संस्था प्रतिनिधी साठी पुणे येथे क्षमता बांधणीसाठी तीन दिवसीय प्रशिक्षण.* ,  जळगाव जिल्ह्यातून आधार संस्था प्रतिनिधी सहभागी
1 min read

महाराष्ट्र राज्यातील बाल सुरक्षा विषयावर कार्यरत स्वयंसेवी संस्था प्रतिनिधी साठी पुणे येथे क्षमता बांधणीसाठी तीन दिवसीय प्रशिक्षण.* , जळगाव जिल्ह्यातून आधार संस्था प्रतिनिधी सहभागी

Loading

*महाराष्ट्र राज्यातील बाल सुरक्षा विषयावर कार्यरत स्वयंसेवी संस्था प्रतिनिधी साठी पुणे येथे क्षमता बांधणीसाठी तीन दिवसीय प्रशिक्षण.*

जळगाव जिल्ह्यातून आधार संस्था प्रतिनिधी सहभागी

पुणे प्रतिनिधी

ऍक्सेस टू जस्टिस फॉर चिल्ड्रेन,
इंडिया चाईल्ड प्रोटेक्शन,
सी लॅब फॉर चिल्ड्रेन,
जस्ट राईट्स फॉर चिल्ड्रेन प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे येथील एस एम जोशी फाऊंडेशन यांच्या सभागृहात महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात कार्यरत स्वयंसेवी संस्थाच्या टीम मेंबर साठी तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम 16,17,18 सप्टेंबर 2025या कालावधीत संपन्न होत आहे.
साधन व्यक्ती म्हणून दिल्ली येथून जस्ट राईट्स फॉर चिल्ड्रेन प्रकल्प चे राष्ट्रीय समन्वयक राजीव भारद्वाज , टीम मेंबर चंदन बर्मन, अभय अवस्थी, जिन्सी जॉन, माधवी घोडके यांनी बाल संरक्षण विषयावर मार्गदर्शन सत्र घेतले.

महिला व बाल विकास विभाग, आयुक्तालय पुणे येथे जॉईंट कमिशनर राहुल मोरे यांची शिष्टमंडळाने घेतली भेट.
महिला व बाल विकास विभाग चे जॉइंट कमिशनर मा . राहुल मोरे यांची महाराष्ट्र राज्यातील सर्व स्वयंसेवी संस्था प्रतिनिधी यांनी जस्ट राईट्स फॉर चिल्ड्रेन प्रकल्प चे राष्ट्रीय समन्वयक राजीव भारद्वाज यांच्या सह कार्यालयात भेट घेऊन समन्वय, संवाद विकसित करण्यासाठी आवाहन केले. त्यास सकारात्मक व उत्साहवर्धक प्रतिसाद मिळाला.

प्रशिक्षण कार्यक्रम स्थळी, एस. एम. जोशी फाऊंडेशन पुणे येथे दुसऱ्या दिवशी महाराष्ट्र शासन, महिला व बाल विकास विभाग,
जॉईंट कमिशनर राहुल मोरे यांनी भेट दिली आणि प्रशिक्षणार्थी सोबत महत्वपूर्ण संवाद साधला.
राज्य स्तर आणि सर्व जिल्ह्यांमध्ये जिल्हा प्रशासन महिला व बाल विकास विभाग बालविवाह मुक्त भारत अभियान, बाल तस्करी विरोधात कार्य, बाल लैंगिक शोषण प्रतिबंध करण्यासाठी एकजुटीने कार्य करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन जॉइंट कमिशनर राहुल मोरे यांनी केले.
जळगाव जिल्ह्यातून आधार संस्था प्रतिनिधी संचालक
प्रा विजयकुमार वाघमारे, प्रकल्प समन्वयक आनंद पगारे, क्षेत्र समन्वयक मोहिनी धनगर, सुनील हिवाळे यांनी सहभाग नोंदवला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *