कोणत्याही संघटनेत अध्यक्ष हा कार्यकर्त्यांचा आधारस्तंभ असला पाहिजे– प्रा. अशोक पवार
1 min read

कोणत्याही संघटनेत अध्यक्ष हा कार्यकर्त्यांचा आधारस्तंभ असला पाहिजे– प्रा. अशोक पवार

Loading

कोणत्याही संघटनेत अध्यक्ष हा कार्यकर्त्यांचा आधारस्तंभ असला पाहिजे– प्रा. अशोक पवार

अमळनेर प्रतिनिधी
“कोणतीही संघटना म्हटली म्हणजे तिचे खरे संघटन असणे गरजेचे आहे. अध्यक्षाने सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या समस्या समजून घेतल्या पाहिजेत. कारण संघटनेत अध्यक्ष हा अत्यंत महत्त्वाचा असतो. अध्यक्षाचा निर्णय संघटनेतील पदाधिकाऱ्यांना मान्य असावा. तो नेहमी कार्यकर्त्यांमध्ये बसून त्यांचे सुखदुःख जाणून घेणारा असावा, यालाच खरी संघटना म्हणतात,” असे विचार माहिती अधिकारी व संविधान अभ्यासक प्रा. अशोक पवार यांनी व्यक्त केले.
ते अमळनेर येथे मंगळ ग्रह मंदिरातील सभागृहात पार पडलेल्या राज्यस्तरीय व्हाईस ऑफ मीडियाच्या केटर कॅम्प मध्ये मार्गदर्शन करताना बोलत होते.
यावेळी प्रा. पवार पुढे म्हणाले की, “व्हाईस ऑफ मीडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीपजी काळे हे खऱ्या अर्थाने पत्रकारामध्ये मिसळतात. ते विचारपिठापासून दूर राहून पत्रकारांबरोबर बसतात. त्यामुळे पत्रकारांना काम करताना उर्जा मिळते. पत्रकारांच्या सुखदुःखात सहभागी होणारे संदीपजी काळे, दिव्या भोसले, अनिल मस्के, डॉ. डिगंबर महाले यांसारखी देवमाणसं मागे उभी राहिली तर एक सशक्त ताकद तयार होते. आणि ही ताकद सरकारला आपला आवाज ऐकण्यास भाग पाडते.”
कार्यक्रमात व्हाईस ऑफ मीडियाचे तालुका अध्यक्ष उमेश काटे, बापूराव ठाकरे, दयाराम पाटील यांनी प्रा. पवार यांचे स्वागत केले.
पुढे मार्गदर्शन करताना प्रा पवार यांनी संघटन कौशल्य वाढीसाठी आवश्यक क्लुप्त्या सांगितल्या व “कार्यकर्ता कसा घडावा” याविषयी सविस्तर व मौलिक मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाला राज्यभरातील व्हाईस ऑफ मीडियाचे पदाधिकारी, सभासद, बांधव-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या राज्यस्तरीय केटर कॅम्प यशस्वी करण्यासाठी मंगळ ग्रह संस्थांचे विश्वस्त मंडळ, सेवेकरी तसेच व्हाईस ऑफ मीडियाचे सर्व पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *