“कवितेशिवाय जीवन अपूर्ण – प्रा. आंधळे यांचे काव्यमहती व्याख्यान विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध”
1 min read

“कवितेशिवाय जीवन अपूर्ण – प्रा. आंधळे यांचे काव्यमहती व्याख्यान विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध”

Loading

“कवितेशिवाय जीवन अपूर्ण – प्रा. आंधळे यांचे काव्यमहती व्याख्यान विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध”

जळगांव प्रतिनिधी
मानवी मन आणि मानवी जीवन कवितेनेच समृद्ध होत आले असून ती ठायी ठायी प्रेरणेचा स्त्रोत म्हणूनच कामी आली आहे.संस्कार आणि संस्कृतीची जननी असल्याचे स्पष्ट करतांना संत साहित्यापासून तर खान्देश कन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या कवितांचे समर्पक संदर्भ देत विद्यार्थी वृंदास मंत्रमुग्ध केले.काल दि.१६ सप्टेंबर २०२५ रोजी प्रकाश विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय वाघोदा ता.रावेर या संस्थेच्या हिरक महोत्सवानिमित्त आयोजित व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प गुंफतांना कवी प्रा.वा. ना.आंधळे यांनी काव्यमहतीचे सूतोवाच आपल्या व्याख्यानातून केले.
समारंभाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष मा. पी.टी. महाजन सर हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे चेअरमन दादासाहेब डी. के.महाजन,उपाध्यक्ष श्री.श्रावण सीताराम महाजन,सचिव श्री.किशोर जगन्नाथ पाटील,सहसचिव श्री.पी.एल. महाजन,मुख्याध्यापक श्री.व्ही.एस.महाजन,पर्यवेक्षक आर.पी.महाजन श्री.राजेश बडगुजर सर व श्री.लक्ष्मीकांत घुगे सर यांची उपस्थिती व्यासपीठावर होती.प्रास्ताविक श्री.राजेश बडगुजर सरांनी केले तर वक्त्यांचा परिचय श्री.जे.आर.पाटील सर यांनी करून दिला.
प्रा.आंधळे आपल्या व्याख्यानात पुढे म्हणाले, जगणं कवितेने सुंदर केलं आहेच मरणाऱ्या व्यक्तीचं कौतुक करतांना आमच्या ग्रामीण भागात बायका प्रेताभोवती गाण्यातूनच रडतात.मानवी जन्मापासून तर मानवी मरणापर्यंत साथसोबत करते ती कविता.हे सांगतांना अनेक कवितांचे दाखले व प्रसंग त्यांनी विद्यार्थ्यांपुढे ठेवले.प्रा.आंधळे लिखित *पप्पा माझ्या आईला बोलू नका* या कवितेच्या सादरीकरणावेळी अनेकांचे डोळे पाणावले.
कार्यक्रमाचे सूत्र संचलन श्री.यू.जी.महाजन सर यांनी तर आभार प्रदर्शन सौ.भावना पाटील मॅडम यांनी केले.व्याख्याना स विद्यार्थी,शिक्षक व संस्थेच्या संचालक मंडळाची उपस्थिती लाभली.

One thought on ““कवितेशिवाय जीवन अपूर्ण – प्रा. आंधळे यांचे काव्यमहती व्याख्यान विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध”

  1. वाह अतिशय सुंदर काव्य महती व्याख्यान उपक्रम! मन प्रसन्न झाले! 🪷🪷👏👏👏🌹🌹🌹🫡🫡🫡🫡

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *