समाजकार्य व अध्यात्मिक कार्यासाठी नानासाहेब महाजनांचा गौरवपूर्ण सत्कार
![]()
समाजकार्य व अध्यात्मिक कार्यासाठी नानासाहेब महाजनांचा गौरवपूर्ण सत्कार
धुळे प्रतिनिधी
माळमाथा विभागातील ब्राह्मणवेल येथील जीवनज्योती फुले एज्युकेशन सोसायटी ब्राह्मणवेल संचलित कै . बळीरामदादा माध्यमिक विद्यालय ब्राह्मणवेल चे संस्था अध्यक्ष तसेच गावाचे माजी सरपंच आणि सामाजिक क्षेत्रात सदैव पुढे असणारे असे नानासाहेब श्री तुकाराम बळीराम महाजन यांनी नुकताच नर्मदा परिक्रमा पूर्ण केले . म्हणून माऊली परिवार ने” माऊली पुरस्काराने ” सन्मानित केले व यावर्षी चा माऊली पुरस्कार माऊली परिवाराच्या मार्गदर्शिका ह भ प यशोदा आक्का ( जायखेडा )’ ह भ प विठोबा आण्णा ( ताहराबाद ) ‘ आचार्य हरी भाऊ भवाडे ( तवाडे ) ह भ प भावसा महाराज शास्त्री ( नंदीनी ) ह भ प अशोक महारज ( भिमाशंकर ) ह भ प जयराम बाबा (गोंडेगांववर ) ह भ प विश्वनाथ महाराज ( तळवाडे ) ह भ प भिला बापू (खोरीकर ) ह भ प दौलतनाथ महाराज ( छडवेल ) प्रमुख उपस्थितीत व शुभ हस्ते देण्यात आला . या प्रसंगी ह भ प मच्छिंद्रनाथ महाराज ( वाडी भोकर ) यांचे सुश्राव्य प्रवचन झाले . सदरचा कार्यक्रम गहिनीनाथ आश्रम (छडवेल ) येथे घेण्यात आला . यापुरस्काराने संस्थेचे नाव लौकिक बाळमाता परिसरात वाढलेली आहे नानासाहेबांचे अभिनंदन संस्थेचे सर्व पदाधिकारी तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी म्हणून आणि ग्रामस्थ मंडळी ब्राम्हणवेल यांच्या वतीने करण्यात आलेले आहे .


” जय सिताराम ! आदरणीय माऊली नानासाहेब आपले हृदयापासून हार्दिक अभिनंदन! चरणस्पर्श! 💗💗🌹🌹💗💗🌹🌹👏👏👏🫡🫡🫡