लेवायूथ फोरम तर्फे पितृपक्षा निमित्त अनाथाश्रमात अन्नदान*
![]()
*लेवायूथ फोरम तर्फे पितृपक्षा निमित्त अनाथाश्रमात अन्नदान*
बदलापूर :(प्रतिनिधी-सुनिल इंगळे)पितृपक्षाच्या पवित्र पर्वा निमित्ताने समाजोपयोगी कार्याची परंपरा जपत, लेवा युथ फोरम/बदलापूर तर्फे दिनांक १४ सप्टेंबर २०२५रोजी बदलापूर टीमच्या पुढाकाराने लहान मुलांचे आनाथाश्रम (आनंद दिघे अनाथाश्रम) येथे अन्नदानाचा अर्थपूर्ण व सेवाभावी उपक्रम राबविण्यात आला.
समाजहित व परोपकार हीच खरी मानवतेची ओळख आहे. त्याच उदात्त भावनेतून लेवा युथ फोरम व समाजाच्या सहकार्याने एकत्र येऊन अनाथाश्रमातील ११० मुलांना प्रेमाने व आपुलकीने मिसळ पाव आणि बुंदी यांचा स्वादिष्ट मेनू देण्यात आला.
ही सेवा केवळ अन्नदानापुरती मर्यादित नसून समाजात एकतेची, प्रेमाची आणि करुणेची प्रेरणा देणारी ठरली. या उपक्रमात योगदान देणाऱ्या प्रत्येक कुटुंबाचे आणि सहकार्य करणाऱ्या सर्वांचा लेवा युथ फोरम, बदलापूर ने मनःपूर्वक आभार मानले आहेत.बदलापूरमधील लेवा युथ फोरम चे हे उपक्रम समाजासाठी खऱ्या अर्थाने अनुकरणीय असून प्रत्येकाच्या अंतःकरणात सेवा-भाव जागवणारे आहेत.

