राष्ट्रीय चर्मकार महासंघाची अमळनेर शहर व तालुका नवी कार्यकारिणी जाहीर”
![]()
“राष्ट्रीय चर्मकार महासंघाची अमळनेर शहर व तालुका नवी कार्यकारिणी जाहीर”
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
राष्ट्रीय चर्मकार महासंघाची अमळनेर शहर व तालुका कार्यकारिणी दिनांक १३ सप्टेंबर २०२५ रोजी जाहीर करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान राष्ट्रीय कार्याध्यक्ष आप्पासाहेब भानुदासजी विसावे यांनी भूषविले. प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय प्रवक्ते आण्णासाहेब पांडुरंग बाविस्कर, राज्य कार्यकारिणी सदस्य धनराज पवार, जिल्हाध्यक्ष ईश्वरलाल अहिरे, जिल्हा युवा अध्यक्ष दिपक अनुष्ठान, जिल्हा सचिव लक्ष्मण महाले, जिल्हा संघटक धनराज मोरे, तसेच दिलीप वाघ (धरणगाव), दयाराम मोरे (पारोळा), प्रदीप वाघ (चाळीसगाव), देविदास बोरसे यांच्यासह शहर व तालुक्यातील समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नवीन कार्यकारिणी जाहीर करताना अमळनेर शहराध्यक्षपदी नरेश दामोदर कांबळे, उपाध्यक्ष गणेश दामू जाधव, सचिव सुनिल नारायण मोरे यांची निवड झाली. तालुकाध्यक्षपदी अरूण पुंडलिक मोरे (शिरुड), उपाध्यक्ष प्रविण संभाजी वाघ (मठगव्हाण), निवृत्ती पुंजू बागूल (गडखांब), तर सचिव सागर नथ्यू मोरे (पातोंडा) यांची नियुक्ती करण्यात आली.
युवा कार्यकारिणीत शहराध्यक्ष – रविंद्र एकनाथ ठाकरे, उपाध्यक्ष विनोद डिगंबर जाधव, सचिव रविंद्र शंकर साळुंखे यांची निवड झाली. अधिकारी–कर्मचारी विभागात अध्यक्ष संजय तुळशिराम मोरे, उपाध्यक्ष विलास ओंकार बि-हाडे, प्रा. डॉ. माणिक माधव बागले, सचिव वसंत रघुनाथ मोरे यांची निवड झाली.
महिला विभागात अध्यक्ष उषा रविंद्र देवरे, उपाध्यक्ष भारती भिकनराव कार्लेकर, सुरेखा संजय मोरे, तर सचिव प्रियंका सदानंद अहिरराव यांची निवड झाली.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक व सूत्रसंचालन विजय धनगर बि-हाडे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन दंगलदास आधार सोनवणे सर यांनी मानले.

