सेवानिवृत्त (रिटायर्ड) झालेल्या अंगणवाडी सेविका मदतनीसांची जळगांव येथे जिल्हा बैठक उत्साहात संपन्न.*
1 min read

सेवानिवृत्त (रिटायर्ड) झालेल्या अंगणवाडी सेविका मदतनीसांची जळगांव येथे जिल्हा बैठक उत्साहात संपन्न.*

Loading

*सेवानिवृत्त (रिटायर्ड) झालेल्या अंगणवाडी सेविका मदतनीसांची जळगांव येथे जिल्हा बैठक उत्साहात संपन्न.*

जळगांव जिल्ह्यातील सेवानिवृत्त झालेल्या, राजीनामा दिलेल्या सेविका मदतनीस आणि निधन झालेल्या सेविका मदतनीसांच्या वारसांची जेष्ठ कायदेतज्ज्ञ श्री.एस.बी.पाटील (धुळे),रामकृष्ण बी.पाटील आणि युवराज बैसाणे, ऍड.चैतन्य बर्गे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज डॉ.शामा प्रसाद मुखर्जी उद्यान जळगाव येथे बैठक मोठ्या उत्साहात पार पडली.
सदर बैठकीत मा.सुप्रीम कोर्टाने सेविका मदतनीसांना सेवानिवृत्तनंतर ग्रॅच्युटी देण्यात यावी असा सन 2022 मध्ये निकाल दिलेला आहे.
सदर निकालाच्या धर्तीवर जळगांव जिल्ह्यातील सेवानिवृत्त झालेल्या,राजीनामा दिलेल्या आणि निधन झालेल्या सेविका मदतनीसांच्या वारसांना *ग्रॅच्युटी ऍक्ट 1972 नुसार सुमारे 50 हजारांपासून ते साडे तीन लाखापर्यंत इतकी ग्रॅच्युटी रक्कम सेवेनुसार मिळू शकते.* सदर रक्कम मिळण्यासाठी करावयाच्या कोर्टकेसबाबत ऍड.श्री.एस.बी.पाटील यांनी बैठकीला उपस्थित असलेल्या सेविका मदतनीसांना मार्गदर्शन करत ग्रॅच्युटी मिळवून देण्यासाठी सर्वोतोपरीने कायदेशीपणे प्रयत्न केला जाईल असे नमूद केले.
धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील सेविका मदतनीस यांना मा.कोर्टाच्या आदेशानुसार सुमारे 2 कोटी 13 लाख रुपये ग्रॅच्युटी देण्याबाबतची रक्कम धुळे आणि नंदुरबार जिल्हा परिषदेने मा. कोर्टात डिपॉजिट केली असल्याचे युवराज बैसाणे यांनी उपस्थितीतांना सांगितले.
मा. सुप्रीमकोर्ट यांच्या आदेशानुसार आणि धुळे तसेच नंदुरबार जिल्ह्यातील सेविका मदतनीसांच्या धर्तीवर जळगांव जिल्ह्यातील सेविका मदतनीसांनी ग्रॅच्युटीची रक्कम मिळण्यासाठी ज्या ज्या सेविका मदतनीस कोर्टकेस करतील त्यांना मा. कोर्टाच्या आदेशनुसार ग्रॅच्युटीची रक्कम मिळू शकते असे रामकृष्ण पाटील यांना मार्गदर्शन करताना सांगितले.
तसेच ग्रॅच्युटीची रक्कम मिळण्यासाठी कोर्टकेसशिवाय पर्याय नसल्याबाबतही श्री. पाटील यांनी नमूद केले.
सदर बैठकीस सेविका मदतनीस आणि वारस मोठ्या संख्येने उपस्थित असल्याची माहिती रामकृष्ण पाटील यांनी दिली.
*टीप – सदर मॅसेज संबंधित सेविका मदतनीस आणि वारस यांचे पर्यंत पाठवावा ही विनंती.*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *