अर्बन बँकेच्या व्हाईस चेअरमनपदी वसुंधरा लांडगे; शुभेच्छा व सत्कारांचा वर्षाव  पदांच्या मागे न धावता आपल्या कार्यातून पदांना प्रतिष्ठा मिळवून देणाऱ्या ताईसाहेबांचा सर्वच क्षेत्रातील मान्यवरांकडून गौरव
1 min read

अर्बन बँकेच्या व्हाईस चेअरमनपदी वसुंधरा लांडगे; शुभेच्छा व सत्कारांचा वर्षाव पदांच्या मागे न धावता आपल्या कार्यातून पदांना प्रतिष्ठा मिळवून देणाऱ्या ताईसाहेबांचा सर्वच क्षेत्रातील मान्यवरांकडून गौरव

Loading

अर्बन बँकेच्या व्हाईस चेअरमनपदी वसुंधरा लांडगे; शुभेच्छा व सत्कारांचा वर्षाव

पदांच्या मागे न धावता आपल्या कार्यातून पदांना प्रतिष्ठा मिळवून देणाऱ्या ताईसाहेबांचा सर्वच क्षेत्रातील मान्यवरांकडून गौरव

अमळनेर प्रतिनिधी :
अमळनेर अर्बन बँकेच्या व्हाईस चेअरमनपदी सौ. वसुंधरा दशरथ सोमा लांडगे यांची निवड झाल्यानंतर त्यांच्यावर विविध क्षेत्रातील मान्यवर, समाजबांधव, हितचिंतक व नातेवाईकांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अनेक मान्यवरांनी लांडगे यांच्या निवासस्थानी प्रत्यक्ष भेट देत त्यांचा सत्कार करून भावी वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

सौ. वसुंधरा लांडगे या खानदेश शिक्षण मंडळाच्या विश्वस्त तसेच मराठी वाङ्मय मंडळाच्या सदस्या असून, शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक व विविध संस्थांच्या माध्यमातून त्या सातत्याने सक्रिय योगदान देत आहेत. आपल्या कार्याचा ठसा उमटवत त्यांनी अनेक जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळल्या आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेत विविध संस्थांनी त्यांची तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणूनही निवड केली आहे.

पदांच्या मागे त्या कधी धावल्या नाहीत; पदेच त्यांच्या कार्याचा शोध घेत आली!”

सामाजिक बांधिलकी, आपुलकी आणि प्रत्येकाच्या सुख-दुःखात धावून जाण्याची वृत्ती ही लांडगे परिवाराची विशेष ओळख मानली जाते. कोणताही सामाजिक, कौटुंबिक अथवा सार्वजनिक कार्यक्रम असो, वसुंधरा लांडगे आणि ज्येष्ठ समाजसेवक दशरथ सोमा लांडगे हे वेळेचे महत्त्व देत आवर्जून उपस्थित राहतात. त्यामुळे समाजातील विविध घटकांमध्ये या कुटुंबाबद्दल आपुलकी आणि आदराची भावना आहे.
अनेक निवडणुकांमध्ये यश मिळवत विविध पदांची जबाबदारी त्यांनी सांभाळली आहे. मात्र, यश आणि सन्मान मिळूनही पाय जमिनीवर ठेवून मितभाषी, प्रेमळ आणि सर्वांशी आपुलकीने वागण्याची त्यांची शैली आजही कायम आहे. त्यांच्या कार्याला अनेक मानसन्मान व पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.

शिक्षण, संस्कार आणि कुटुंबाची भक्कम साथ

वसुंधराताई लांडगे यांचे कौटुंबिक जीवनही तितकेच समाधानकारक आहे. त्यांच्या दोन्ही मुली उच्चशिक्षित असून, एक शिक्षिका तर दुसरी वन विभागात वरिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत आहे. दोन्ही जावई आपापल्या क्षेत्रात कार्यरत असून, एक मुख्याध्यापक तर दुसरे प्राध्यापक आहेत. जावयांनाही मुलांप्रमाणेच प्रेम व आपुलकी देणारे हे कुटुंब संस्कारांची सुंदर परंपरा जपत आहे. नातवंडांनाही योग्य संस्कारांचे बाळकडू देत कुटुंबातील प्रेमळ वातावरण त्यांनी कायम ठेवले आहे.

मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार

अर्बन बँकेच्या व्हाईस चेअरमनपदी निवड झाल्यानंतर अमळनेर तालुक्याचे आमदार व माजी मंत्री अनिल भाईदास पाटील, शेतकी संघाचे अध्यक्ष संभाजी पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भागवत पाटील तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी एल. टी. नाना पाटील यांनी लांडगे यांच्या घरी भेट देऊन त्यांचा सत्कार केला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यावेळी हिंदी अध्यापक मंडळाच्या वतीनेही वसुंधरा लांडगे यांचा सत्कार करण्यात आला. मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र पाटील, उपाध्यक्ष योगेश्री पाटील, कोषाध्यक्ष प्रतिभा जाधव आणि प्रसिद्धी प्रमुख ईश्वर महाजन यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा गौरव केला.

याशिवाय समाजबांधव, विविध क्षेत्रातील मान्यवर, नातेवाईक व हितचिंतकांनी लांडगे परिवाराची सदिच्छा भेट घेत शुभेच्छा दिल्या. त्यामुळे लांडगे यांच्या निवडीचा आनंद त्यांच्या कुटुंबापुरता मर्यादित न राहता अमळनेरच्या सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातही उत्साहाचा विषय ठरला आहे.

आपल्या शुभेच्छा आणि आशीर्वाद सदैव पाठीशी राहू द्या”

सत्काराला उत्तर देताना सौ. वसुंधरा लांडगे यांनी सर्व मान्यवर, समाजबांधव, नातेवाईक व हितचिंतकांचे मनःपूर्वक आभार मानले. मिळालेल्या शुभेच्छा व आशीर्वाद हीच पुढील कार्याची प्रेरणा असून, भविष्यातही आपल्या सर्वांच्या सहकार्याने सामाजिक व संस्थात्मक जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडत राहू, असे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *