हिंदी दिवस उपक्रमांनी विद्यार्थ्यांमध्ये जागवला भाषाभिमान” ए. टी. झांबरे विद्यालयात निबंध, भित्तिचित्र, भाषण स्पर्धांचे आयोजन*
![]()
*”हिंदी दिवस उपक्रमांनी विद्यार्थ्यांमध्ये जागवला भाषाभिमान” ए. टी. झांबरे विद्यालयात निबंध, भित्तिचित्र, भाषण स्पर्धांचे आयोजन*
जळगाव दि. १५/०९/२०२५ :
ए. टी. झांबरे विद्यालयात हिंदी दिवस उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या भाषिक आणि सृजनशीलतेच्या अभिव्यक्तीसाठी निबंध लेखन, भित्तिचित्र निर्मिती आणि भाषण स्पर्धा आयोजित करण्यात आल्या.
कार्यक्रमाचे आयोजन व समन्वय विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती प्रणीता झांबरे तसेच पर्यवेक्षक श्री. नरेंद्र पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
या कार्यक्रमात श्री. एकनाथ पाचपांडे, श्री. रफिक तडवी, सौ. सुचिता बाविस्कर. श्री. वेदप्रकाश आर्य, श्री. चेतन सोनार, श्री. महेंद्र मिरकुटे आणि सौ. रत्नमाला शिंदे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी हिंदी भाषेचे महत्व, तिचे साहित्यिक वैभव आणि राष्ट्रीय एकात्मतेतील योगदान या विषयांवर विद्यार्थ्यांना प्रेरणादायी विचार दिले.
स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी हिंदीवरील प्रेम व अभिमान आपल्या लेखन, भाषण व चित्रकलेतून व्यक्त केला. त्यांच्या कल्पनाशक्तीतून उमटलेली भित्तिचित्रे आणि विचारप्रवण निबंधांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

