समृद्ध ग्रामपंचायत अभियानात कळमसरे अग्रगण्य, आयएसओ प्रमाणपत्राने गौरव
1 min read

समृद्ध ग्रामपंचायत अभियानात कळमसरे अग्रगण्य, आयएसओ प्रमाणपत्राने गौरव

Loading

समृद्ध ग्रामपंचायत अभियानात कळमसरे अग्रगण्य, आयएसओ प्रमाणपत्राने गौरव

अमळनेर प्रतिनिधी
तालुक्यातील राजकीय, आर्थिक व सामाजिक दृष्ट्या अग्रगण्य समजले जाणारे कळमसरे या गावाच्या ग्रामपंचायतीस गावात उत्कृष्ट काम केल्याबद्दल ग्रामविकास विभागाच्या वतीने अमळनेर येथील इंदिरा भवन सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत अभियान या कार्यशाळेप्रसंगी मा. नगराध्यक्ष तथा मा. जि प सदस्य जयश्री पाटील गटविकास अधिकारी एन आर पाटील यांच्या हस्ते आय एस ओ मानांकन प्रमाणपत्र सरपंच जगदीश निकम, उपसरपंच जितेंद्रसिंग पाटील, ग्रामपंचायत सदस्य दिनकर चव्हाण तसेच ग्रामपंचायत अधिकारी ज्ञानेश्वर पाटील यांना प्रदान करण्यात आले.
गावात समृद्ध ग्रामपंचायत अभियानांतर्गत गावठाण जागेवर वृक्ष लागवड करणे, सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देणे,ग्रामस्थांना शुद्ध पेयजलाचा पुरेसा पाणीपुरवठा करणे, स्वच्छता अभियान राबवणे, ग्रामपंचायत करांचा भरणा करण्यास लोकांना प्रोत्साहित करणे, सर्व दाखले व उतारे ऑनलाइन प्रक्रिया द्वारे नागरिकांना उपलब्ध करून देणे, ग्रामपंचायत कार्यालय अध्यायवत स्वरूपात ठेवून प्रशासकीय कामकाजात पारदर्शकता आणणे, सर्व शासकीय योजनांचा लाभ सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविणे, शौचालय, मनरेगाची कामे तसेच लहान मुलांना कुपोषित बालकांना सकस आहार पुरविणे, दिव्यांगांसाठीच्या राखीव निधी देणे, मागासवर्गीय समाजासाठी निधी उपलब्ध करून देणे, शिक्षण, आरोग्य तसेच इतर सर्व शासकीय कामांमध्ये सदर ग्रामपंचायत पात्र ठरल्याने आय एस ओ मानांकन प्राप्त झाल्याचे यावेळी सरपंच,उपसरपंच, ग्रामपंचायत अधिकारी यांनी यावेळी सांगितले.
सदर कार्यक्रमाप्रसंगी संपर्क अधिकारी श्री भदाणे महिला व बालकल्याण चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जळगाव तसेच उप अभियंता डी डी पाटील तसेच पंचायत समितीचे विस्तार अधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *