पं.नेहरू समाजकार्य महाविद्यालयात PMUSHA अंतर्गत एक दिवसीय कौशल्य विकासासाठी कार्यशाळा*
![]()
*पं.नेहरू समाजकार्य महाविद्यालयात PMUSHA अंतर्गत एक दिवसीय कौशल्य विकासासाठी कार्यशाळा*
अमळनेर प्रतिनिधी
प्रधानमंत्री उच्च स्तर शिक्षा अभियान (PMUSHA) अंतर्गत कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव आणि श्रम साफल्य एज्युकेशन सोसायटी संचलित समाजकार्य महाविद्यालय अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय कौशल्य विकास कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
कार्यशाळा उद्घाटन सिनेट सदस्य डॉ संदीप नेरकर यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष अभिजीत भांडारकर होते. प्राचार्य डॉ पी एस पाटील, कार्यशाळा समन्वयक डॉ भरत खंडागळे व विभाग प्रमुख डॉ जगदिश सोनवणे यांच्या उपस्थितीत पार पडला.
साधन व्यक्ती म्हणून डॉ लिलाधर पाटील, डॉ संदीप नेरकर, जळगाव येथील डॉ विजेता सिंग,शेंदुर्णीचे डॉ दिनेश पाटील यांनी विविध सत्रामध्ये उद्बोधन केले.
कार्यशाळेस जळगाव येथील विद्यापीठ समाजकार्य विभाग,समाज कार्य महाविद्यालय जळगाव,समाज कार्य महाविद्यालय चोपडा, समाज कार्य महाविद्यालय मोराणे धुळे, समाजकार्य विभाग एम जे कॉलेज, प्रताप महाविद्यालय,मारवड महाविद्यालय,अमळनेर समाजकार्य महाविद्यालयातील विद्यार्थी सहभागी झाले.
समारोप कार्यक्रम अतिथी सिनेट सदस्य प्रा डॉ कांचन महाजन, अध्यक्षस्थानी डॉ. महेश पाटील, संचालक ओम भांडारकर उपस्थित होते.
सर्व विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र, भोजन व चहापान व्यवस्था करण्यात आली होती.
यशस्वितेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले
कार्यशाळा सूत्र संचलन यामिनी पाटील, किर्ती सोनवणे यांनी केले.

