अखिल भारतीय माळी महासंघातर्फे जैताणेत साक्री तालुक्यातील ५० गुणवंतांचा तालुकास्तरीय गुणगौरव!
![]()
अखिल भारतीय माळी महासंघातर्फे जैताणेत साक्री तालुक्यातील ५० गुणवंतांचा तालुकास्तरीय गुणगौरव!
निजामपूर- जैताणे (ता.साक्री) येथील माळी समाज मंगल कार्यालयात अखिल भारतीय माळी महासंघातर्फे रविवारी (ता.७) दुपारी माळी समाजाच्या सुमारे ५० गुणवंतांचा मान्यवरांच्या हस्ते साक्री तालुकास्तरीय गुणगौरव करण्यात आला. महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा नाशिक विभागीय अध्यक्ष वासुदेव देवरे अध्यक्षस्थानी होते.राष्ट्रीय अध्यक्ष विलासराव पाटील यांनी दूरध्वनीद्वारे शुभेच्छा संदेश दिला.
“समाजाचा केवळ संख्यात्मक विकास महत्वाचा नसून गुणात्मक विकासही तेवढाच महत्वाचा आहे. तसेच समाज संघटन ही काळाची गरज असून समाजातील गुणवंतांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली तरच समाजाची प्रगती होईल,” असे प्रतिपादन श्री.वासुदेव देवरे यांनी अध्यक्षीय मनोगतातून केले. मान्यवरांच्या हस्ते क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले, क्रांतीज्योती, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले, जैताणेचे दिवंगत सरपंच संजय खैरनार यांच्या प्रतिमा पूजनाने व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचे उदघाटन झाले.
महासंघाचे धुळे जिल्हाध्यक्ष आर.के.माळी, राष्ट्रीय अध्यक्षांचे सचिव काशिनाथ माळी, धुळे महानगराध्यक्ष हरिश्चंद्र रेंडे, जिल्हा कार्याध्यक्ष प्रा.भगवान जगदाळे, जिल्हा उपाध्यक्ष संतोष माळी, कर्मचारी आघाडीचे कार्याध्यक्ष राजेंद्र माळी, शिरपूर तालुकाध्यक्ष सुनील माळी, शिरपूर तालुका सचिव सुधाकर माळी, बळीरामदादा माध्यमिक विद्यालयाचे सचिव एकनाथ माळी, जैताणेचे माळी समाजाध्यक्ष शांतीलाल जाधव यांच्यासह माळी महासंघाचे पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.
शैक्षणिक वर्ष-२०२४-२५ मध्ये १०वी, १२वी, पदविका, पदवी, पदव्युत्तर, मेडिकल, इंजिनिअरिंग, नेट, सेट, पीएचडी व स्पर्धा परीक्षेत यशस्वी झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार झाला. तसेच विविध क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व विशेष पुरस्कारप्राप्त समाज बांधवांचा देखील सत्कार झाला. कला, क्रीडा, संगीत, उद्योग, व्यवसाय, शिक्षण, पोलीस आदी क्षेत्रांसह आजी/माजी सैनिक, प्रगतिशील शेतकरी यांनाही विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यापुढे हा तालुकास्तरीय कार्यक्रम दरवर्षी साक्री, पिंपळनेर, दहिवेल, निजामपूर-जैताणे अशा चारही ठिकाणी रोटेशन पद्धतीने घेतला जाईल, असेही जाहीर करण्यात आले. दहिवेलचे सामाजिक कार्यकर्ते कन्हैयालाल माळी, रामदास माळी, भामेरचे माजी सरपंच जिभाऊ वाघ, शांतीलाल भदाणे, बळीरामदादा विद्यालयाचे नवनियुक्त मुख्याध्यापक बन्सीलाल माळी आदींचाही यावेळी महासंघातर्फे विशेष सत्कार झाला.
विभागीय अध्यक्ष वासुदेव देवरे, जिल्हाध्यक्ष आरके माळी, पत्रकार रघुवीर खारकर, रवींद्र जाधव, गुणवंत कर्मचारी राजेंद्र माळी यांच्यासह गुणवंत विद्यार्थ्यांनी प्रातिनिधिक मनोगते व्यक्त केली. प्रा.भगवान जगदाळे यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. काशिनाथ माळी सर यांनी आभार मानले. महासंघाचे दिवंगत मानद अध्यक्ष ऍड. संभाजीराव पगारे, दिवंगत नाशिक विभागीय उपाध्यक्ष संजय खैरनार यांना सामूहिक श्रद्धांजली वाहण्यात आली. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महासंघाचे धुळे जिल्हा कार्याध्यक्ष प्रा.भगवान जगदाळे, जैताणे शहराध्यक्ष मनिष संजय खैरनार, जैताणे शहर उपाध्यक्ष प्रमोद गोकुळ महाजन, साक्री मंडळाध्यक्ष तुकाराम खलाणे, पिंपळनेर मंडळाध्यक्ष धनंजय घरटे, धुळे जिल्हा उपाध्यक्ष गुलाब माळी, जैताणेचे माजी शहराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, मातोश्री सेवाभावी संस्थेचे सचिव सुशीलकुमार जगदाळे, विजय सूर्यवंशी सर, सामाजिक कार्यकर्ते राकेश शेवाळे, नंदकुमार जाधव, भूषण भदाणे, कमलेश भामरे, सदा महाजन, पप्पू माळी आदींसह संघशक्ती व्यायामशाळेचे पदाधिकारी, माळी महासंघाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. महासंघाच्या साक्री व पिंपळनेर मंडळाने कार्यक्रमाचे संयोजन केले.

