ज्ञान, संस्कार व प्रेरणेचा संगम : नंदादीप विद्यालयात योगी महाराजांचे मार्गदर्शन
1 min read

ज्ञान, संस्कार व प्रेरणेचा संगम : नंदादीप विद्यालयात योगी महाराजांचे मार्गदर्शन

Loading

ज्ञान, संस्कार व प्रेरणेचा संगम : नंदादीप विद्यालयात योगी महाराजांचे मार्गदर्शन

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
निंब (ता. अमळनेर)येथील नंदादीप माध्यमिक विद्यालयात गुरुतुल्य व विद्वान, तत्त्वज्ञान-लॉजिक व मानसशास्त्राचे अभ्यासक मा. प्रा. डि. डि. पाटील (योगी महाराज) यांनी सदिच्छा भेट देऊन विद्यार्थ्यांना अभ्यासाचे महत्त्व, वेळेचे नियोजन व बालसंस्कारांविषयी प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाची सुरुवात स्वामी विवेकानंद महाराजांच्या पूजनाने झाली. प्रमुख पाहुणे माजी शिक्षक श्री. व्हि. एच. चौधरी व विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. ए. बी. चौधरी यांनी स्वामी विवेकानंदांचे ग्रंथ व पुष्पगुच्छ देऊन योगी महाराजांचा सत्कार केला. परंतु साधेपणाचे दर्शन घडवत योगी महाराजांनी शाल परत करून विद्यार्थ्यांसाठी तीच खरी संपत्ती असल्याचा संदेश दिला.
या प्रसंगी श्री. ए. जी. पाटील यांच्या सूत्रसंचालनाखाली सर्वश्री. आर. आर. पाटील, शिंगाणे सर, व्हि. एम. चौधरी, श्री. विलास पाटील यांच्यासह सर्व शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विद्यार्थ्यांशी संवाद साधताना योगी महाराजांनी स्वामी विवेकानंदांच्या विचारांचा संदर्भ देत, “शिस्त, परिश्रम, वाचन व संस्कार हीच खरी जीवनाची शिदोरी” असे प्रतिपादन केले. त्यांच्या प्रेरणादायी शब्दांनी शाळेचे वातावरण ज्ञान, ऊर्जा व सकारात्मकतेने भारून गेले.
हा कार्यक्रम नंदादीप विद्यालयासाठी संस्मरणीय ठरला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *