अमळनेरात गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत भक्ती व उत्साहाचा जल्लोष
1 min read

अमळनेरात गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत भक्ती व उत्साहाचा जल्लोष

Loading

अमळनेरात गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत भक्ती व उत्साहाचा जल्लोष

अमळनेर प्रतिनिधी
गणेशोत्सवाच्या दरवर्षीप्रमाणे अमळनेर शहरात बाराव्या (१२) दिवशी विसर्जन मिरवणुकीत भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचे अनोखे दर्शन घडले. सानेनगर येथील शिवछत्रपती गणेशोत्सव मंडळ, तांबेपुरा येथील जागृत हनुमान गणेशोत्सव मंडळ, तसेच मेघनगरी येथील मेघनगरी गणेशोत्सव मंडळ यांच्या मिरवणुकांत पारंपरिक नृत्यांचा जल्लोष आणि आरतीच्या सेवेतून भक्तिमय वातावरण अनुभवायला मिळाले.
यावेळी सूर्यवंशी बिल्डिंग येथील ओम साई कन्हैया गणेशोत्सव मंडळ यांच्या वतीने भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. विसर्जनाच्या या दिवशी भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेत आनंद व्यक्त केला.
उत्सवातील या खास क्षणी मंडळांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी माजी नगरसेवक विक्रांत पाटील तसेच सामाजिक कार्यकर्त्या स्वप्ना पाटील यांचे स्वागत व सत्कार केला. या सन्मानाबद्दल त्यांनी सर्व गणेशोत्सव मंडळांचे मनःपूर्वक आभार मानले व भविष्यातही अशाच उत्साहाने एकत्रितपणे गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले.
गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत सजवलेल्या रथांवरून गजरात “गणपती बाप्पा मोरया”चे घोष निनादत होते. भक्तांच्या आनंदात, नृत्यात व उत्साहात गणेशभक्तीची छटा स्पष्टपणे दिसून येत होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *