अमळनेर PTA क्लासेस संघटनेतर्फे अंबरिष ऋषी टेकडीवर हरित शिक्षक दिन
1 min read

अमळनेर PTA क्लासेस संघटनेतर्फे अंबरिष ऋषी टेकडीवर हरित शिक्षक दिन

Loading

अमळनेर PTA क्लासेस संघटनेतर्फे अंबरिष ऋषी टेकडीवर हरित शिक्षक दिन

अमळनेर प्रतिनिधी
शिक्षक दिनाचे औचित्य साधून संपूर्ण महाराष्ट्रात “माझा क्लास – माझे झाड” या अभिनव संकल्पनेअंतर्गत पर्यावरणपूरक वृक्षारोपणाचा भव्य उपक्रम महाराष्ट्र राज्य प्रोफेशनल टीचर्स असोसिएशन (PTA) तर्फे राबविण्यात आला. या मोहिमेला राज्यभरातील सर्वच PTA क्लास संचालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आपल्या सहभागाने उपक्रम गाजविला.
अमळनेरमध्ये या उपक्रमाचा अनोखा उत्साह अनुभवायला मिळाला. अमळनेर PTA क्लासेस संघटनेच्या सक्रिय सहकार्याने अंबरिष ऋषी टेकडी परिसरात भव्य वृक्षारोपण पार पडले.

प्रमुख मान्यवर उपस्थिती
या कार्यक्रमात अमळनेर PTA क्लासेस संघटनेचे अध्यक्ष भैय्यासाहेब मगर सर, तसेच किरण माळी सर, ॲड. नागराज माळी सर, राकेश बडगुजर सर, सुरश्री वैद्य मॅडम, शेखर कुलकर्णी सर, ज्ञानेश्वर मराठे सर, सुधीर टाकणे सर, हर्षल बडगुजर सर, संदीप महाजन सर, स्वर्णदिप राजपूत सर यांनी सहभाग नोंदविला.
अंबरिष ऋषी टेकडी ग्रुपतर्फे उपाध्यक्ष श्री. नरेश कांबळे, श्री. सूरज अभंगे उपस्थित होते.

सामाजिक वनीकरण विभागाचे सहकार्य
कार्यक्रमाला सामाजिक वनीकरण विभागाचे अमळनेर वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीमती सुनिता धनगर, वनपाल श्रीमती वैशाली साळी, वनरक्षक श्रीमती सिमा शिंदे व श्री. दिनेश देवरे, तसेच रोपवाटिका वनमजूर श्री. दिनेश सैंदाणे यांचे विशेष सहकार्य लाभले. त्यांना श्री. प्रमोद पाटील व श्री. भटू पाटील यांनीही मोलाची साथ दिली.

उद्देश आणि संदेश
या वृक्षारोपण मोहिमेतून विद्यार्थ्यांमध्ये व शिक्षकांमध्ये पर्यावरण संवर्धनाबाबत जागरूकता निर्माण करण्याचा महत्त्वाचा हेतू साध्य झाला. सर्व उपस्थितांनी वृक्षारोपण करून पर्यावरण संरक्षणासाठी एकत्रितपणे कार्य करण्याचा संकल्प केला.

PTA चे अध्यक्ष भैय्यासाहेब मगर सर यांनी आपल्या मनोगतात म्हटले –
“शिक्षक दिन हा केवळ शिक्षकांचा गौरव करण्याचा दिवस नसून, उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षण आणि पर्यावरण संवर्धन या दोन्ही जबाबदाऱ्यांचे भान ठेवण्याचा दिवस आहे.”
या उपक्रमामुळे समाजात पर्यावरणाबाबतची जाणीव वृद्धिंगत होणार असून, PTA संघटनेने आगामी काळातही असेच उपक्रम राबविण्याचा संकल्प व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *