एम.के.सी.एल.तर्फे जळगांव जिल्हा पत्रकार संघासाठी एआय प्रशिक्षण संपन्न
![]()
एम.के.सी.एल.तर्फे जळगांव जिल्हा पत्रकार संघासाठी एआय प्रशिक्षण संपन्न
जळगांव – महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड अर्थात एम.के.सी.एल. तर्फे दि.०४ सप्टेंबर रोजी जिल्हा परिषदेच्या सभागृहाज दुपारी ४ वाजता जळगाव जिल्हा पत्रकार संघासाठी कार्यालयीन कामकाजात पत्रकारांसाठी AI चा कसा वापर करता येईल यासदर्भात या कार्यशाळेअंतर्गत AI प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. या कार्यशाळेला नवनियुक्त जिल्हा माहिती अधिकारी डॉ. रवींद्र ठाकूर, जिल्हा पत्रकार संघाचे विश्वस्त विजयबापू पाटील, कार्यवाहक अशोकआप्पा भाटिया, प्रा. राजेंद्र देशमुख सर, महानगर अध्यक्ष विवेक खडके, ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष भिका चौधरी, MKCL जिल्हा समन्वयक उमाकांत बडगुजर, राजेंद्र चव्हाण आदी उपस्थित होते. यावेळी MKCL चे मार्गदर्शक विनायक कदम, विभागीय व्यवस्थापक पुणे व उत्तर महाराष्ट्र विभाग यांनी एआय विषयी पत्रकारांसाठी उपयुक्त असे खुप छान टूलचे मार्गदर्शन केले. या कार्यशाळेमधील एआय आधारित संकल्पना आणि प्रात्यक्षिके पाहून जिल्हा पत्रकार संघ यांनी हा उपक्रम नवा आणि नाविन्यपूर्ण होता असे आयोजकांचे विशेष कौतुक करुन एम.के.सी.एल. च्या कार्याचे अभिनंदनही केले. यावेळी उपस्थित पत्रकारांनी AI प्रशिक्षण कार्यालयीन कामकाजासाठी हा उपक्रम दिशादर्शक ठरेल असे मत नोंदविले.
कॅप्शन- प्रशिक्षणात सहभागी पत्रकारांना प्रमाणपत्र देतांना ग्रामीणचे अध्यक्ष तथा पारोळा भूषणचे संपादक भिका चौधरी उपस्थित जिल्हा माहिती अधिकारी डॉ. रवींद्र ठाकूर, विश्वस्त विजयबापू पाटील, कार्यवाहक अशोकआप्पा भाटिया, प्रा. राजेंद्र देशमुख, विवेक खडके, विनायक कदम, उमाकांत बडगुजर आदी

