सुलवाडे गावात लुपिन फाऊंडेशन तर्फे राष्ट्रीय पोषण सप्ताह
![]()
सुलवाडे गावात लुपिन फाऊंडेशन तर्फे
राष्ट्रीय पोषण सप्ताह
सुलवाडे :- तालुका शिंदखेडा येथे लुपिन ह्यूमन वेलफेअर अँड रिसर्च फाऊंडेशन तर्फे १सप्टेंबर ते ७ सप्टेंबर-२०२५ पर्यत राष्ट्रीय पोषण आहार कार्यक्रम राबविण्यात येत आहे. सदर कार्यक्रम प्रकल्प व्यवस्थापक सुनील सैंदाणे, प्रशिक्षण समन्वयक कुशावर्त पाटील,प्रकल्प समन्वयक जितेंद्र गायकवाड,पी. यु. व्यवस्थापक तुकाराम मासुळे यांच्या मार्गदर्शन खाली घेण्यात आला.
सदर कार्यक्रमात महिला व बालकल्याण विभागातील श्रीमती एम. एस. पाडवी, रेखा कोळी, कृषी मित्र राहुल माळी, भूषण परदेशीं यांनी गरोदर माता -स्तनदा माता व बालकांच्या पोषण आहार व्यवस्थापन विषयी मार्गदर्शन केले. लुपिन फाऊंडेशन तर्फे गरोदर माता -स्तनदा माता यांना खजूर, राजगिरा लाडू पॉकेट मोफत वाटप करण्यात आले. तसेच अंगणवाडी मुला-मुलींना चिक्की वाटप करण्यात आली.महिलांनी पोषण सप्ताह कार्यकम मध्ये सहभाग घेतल्याबद्दल कृषी मित्र राहुल माळी यांनी आभार मानले, पोषण सप्ताह यशस्वी करण्यासाठी अंगणवाडी सेविका श्रीमती मंदाकिनी पाटील, आशा सेविका मंगला न्याहदे, अंगणवाडी मदतनीस नम्रता चव्हाण यांनी परिश्रम घेतले.

