अमळनेरात गणेशोत्सवाच्या नवव्या दिवशी आरती सेवेचा मान –मा. नगरसेवक विक्रांत पाटील
![]()
अमळनेरात गणेशोत्सवाच्या नवव्या दिवशी आरती सेवेचा मान –मा. नगरसेवक विक्रांत पाटील
अमळनेर प्रतिनिधी :
गणेशोत्सवाचा नादमय जल्लोष सुरु असताना नवव्या (९) दिवशीही शहरातील मंडळांत भक्तिभावाचे वातावरण अनुभवायला मिळाले. यंदा झामीचौकातील “झामीचौकाचा राजा गणेशोत्सव मंडळ”, शिरूडनाका येथील “कन्हैया गणेशोत्सव मंडळ” तसेच कुंटे रोडवरील “सिद्धिविनायक गणेशोत्सव मंडळ” येथे आरतीची सेवा करण्याचा मान नगरसेवक सौ. विक्रांत पाटील व सामाजिक कार्यकर्त्या स्वप्नाताई पाटील यांना लाभला.
मंडळाकडून त्यांचे उत्साहात स्वागत व सत्कार करण्यात आला. या प्रसंगी मंडळातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाविकांच्या उपस्थितीत गणरायाची आरती साजरी केली.
या सन्मानाबद्दल मनःपूर्वक आभार मानताना नगरसेवक सौ. विक्रांत पाटील आणि सामाजिक कार्यकर्त्या स्वप्नाताई पाटील यांनी गणेश मंडळांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे विशेष आभार मानले.
गणेशोत्सवाच्या पारंपरिक आरत्या, ढोल-ताशांचा गजर आणि भाविकांचा मोठा सहभाग यामुळे संपूर्ण परिसरात भक्तिभावाचे व आध्यात्मिक वातावरण निर्माण झाले.

