डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या स्मृतिदिनी भुसावळ म्युनिसिपल हायस्कूलमध्ये शिक्षक दिन साजरा
1 min read

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या स्मृतिदिनी भुसावळ म्युनिसिपल हायस्कूलमध्ये शिक्षक दिन साजरा

Loading

🎓 डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या स्मृतिदिनी भुसावळ म्युनिसिपल हायस्कूलमध्ये शिक्षक दिन साजरा

भुसावळ प्रतिनिधी
नगरपरिषद संचलीत म्युनिसिपल हायस्कूल भुसावळ येथे, भूतपूर्व राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून शिक्षक दिन साजरा करण्यात आला. दिनांक
सर्वप्रथम शाळेचे मुख्याध्यापक सुभाष जी मेढे व सेवाज्येष्ठ शिक्षिका श्रीमती सरला सावकारे व सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनींच्या उपस्थितीत दीप प्रज्वलन करून माल्यार्पण करण्यात आले.
त्यानंतर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवनाविषयी साक्षी जाधव ७वी, रितेश मोरे ९वी, एकता तायडे १० वी, प्रतिज्ञा पासी १० वी
समीर बागवान५ वी या विद्यार्थ्यांनी भाषण रूपाने माहिती दिली. करुणा पाशी या विद्यार्थिनीने शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांवर ती कविता सादर केली.
शाळेच्या सेवाज्येष्ठ शिक्षिका सरला सावकारे,नाना पाटील , संध्या धांडे, रेखा सोनवणे, इत्यादी शिक्षकांनी राधाकृष्णन यांच्या गौरवार्थ भाषणे केली.शाळेचे मुख्याध्यापक सुभाष मेढे.आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की, डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे अतिशय हुशार चाणाक्ष असे राजकारणी होते, ते तत्त्वज्ञानाचे प्रोफेसर होते, अतिशय हुशार असल्यामुळे त्या काळात त्यांना उपराष्ट्रपती नंतर राष्ट्रपती पद मिळालेले होते, एक राष्ट्रपती असून सुद्धा केव्हा येणे एवढे भावनिक होत असत की केव्हा केव्हा ते राजशिष्टाचार सुद्धा विसरून जात असायचे, एकदा ते फ्रान्सला गेलेले होते. आमच्या राष्ट्राध्यक्षांना त्यांना भेटायचे होते. त्यांचे नाव स्टॅलिन असे होते. जेव्हा ते राष्ट्राध्यक्षांना भेटायला गेले. तेव्हा दुपारचे बारा वाजले होते. दुपारच्या बारा वाजेपर्यंत राष्ट्राध्यक्ष झोपूनच होते. तेव्हा राजशिष्टाचार सोडून त्यांनी स्टॅलिनच्या शेनगृहामध्ये प्रवेश केला, तेव्हा त्यांना समजले की स्टॅलिन हे थोडेसे आजारी आहेत. तेव्हा दोघ तत्व व्यक्त्यांमध्ये भरपूर काही गोष्टी झाल्या. आर्थिक विषयावर चर्चा झाली,तत्त्वज्ञानावर चर्चा झाली, राजकारणावर चर्चा झाली, राष्ट्रीय धोरणावर चर्चा झाली, राष्ट्राध्यक्ष स्टॅलिन आजारी असून सुद्धा ते इतके चर्चेत रमले की त्यांना आपल्या आजाराचा विसर पडला. डॉक्टर राधाकृष्णन यांच्या तत्त्वज्ञान त्यांना इतके आवडले की तब्बल तीन तास ते त्यांचे तत्त्वज्ञान ऐकत होते. शेवटी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी जाताना त्यांच्या डोक्यावर हात फिरवला आणि म्हणाले, ” भल्या माणसा, देशाच्या बरोबर स्वतःच्या शरीराची सुद्धा काळजी घेत चल, ” हे वाक्य राज वैभवला शोभून नव्हते, राज शिष्टाचारा ते बसत नव्हते, परंतु डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या तत्त्वज्ञानात मात्र ते बसत होते. ते एवढे मायाळू होते की एका राष्ट्राध्यक्षांनी दुसऱ्या राष्ट्राध्यक्षांच्या डोक्यावर हात फिरवायला नको, परंतु अतिशय भावनिक होऊन आपल्या मुलाप्रमाणे त्यांनी तो हात फिरवला. त्यात जरी रा शिष्टाचार मोडला गेला असला तरीसुद्धा स्टॅलीनला त्याचे मात्र काहीच वाईट वाटले नाही. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी जेव्हा त्यांच्या डोक्यावरून हात फिरवला तेव्हा राष्ट्राध्यक्ष स्टॅलिन त्यांच्या डोळ्यात पाणी आले. व ते म्हणाले एवढी मायेची पाझर देणार एकच राष्ट्राध्यक्ष आहे आणि ते म्हणजे भारताचे राष्ट्राध्यक्ष डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन.
आपल्या विचारांनी, तत्त्वज्ञानाने लोकांची मने जिंकत असतं , पंडित जवाहरलाल नेहरू यांना त्यांचे तत्त्वज्ञान फार आवडत असायचे, ते पंतप्रधान असून सुद्धा तीन तीन तास त्यांचे तत्त्वज्ञान ऐकत असत, एवढे ते ज्ञान होते ”
शाळेचे सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे शिक्षक नरेंद्र राठोड यांनी केले. अतिशय प्रसन्न व शांततामय वातावरणात हा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *