पोलिसांच्या आवाहनाला भडणे गावाचा प्रतिसाद – शांततेत व पारंपारिक पद्धतीने गणरायाचे विसर्जन
![]()
पोलिसांच्या आवाहनाला भडणे गावाचा प्रतिसाद – शांततेत व पारंपारिक पद्धतीने गणरायाचे विसर्जन
शिंदखेडा प्रतिनिधी
शिंदखेडा धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे व शिंदखेडा पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांनी गावातील गणेश मंडळांना डीजेचा कर्कशा आवाजा मुळे लहान मुलं तसे वयस्कर वुद्धांना होणारा त्रास व दुष्परिणाम यामुळे वापर न करता पारंपारिक वाद्यांचा वापर करून ढोल ताशा लेझीम वापर करून मंडळांनी गणेश विसर्जन मिरवणूक काढावी असे आव्हान केले होते या आव्हानाला भडणे येथील पोलीस पाटील युवराज माळी यांनी गावातील मंडळांना पारंपारिक वाद्यांच्या वापर करण्याच आव्हान केले होते या आव्हानाला प्रतिसाद देत भडणे येथील युवा गणेश मित्र मंडळाचे पदाधिकारी यांनी पारंपारिक मराठीवेशभूषा परिधान करून गणरायाच्या निरोप प्रसंगी डीजे बँड न लावता आपल्या गावातील भजनी मंडळ यांना बोलून पारंपारिक पद्धतीने गणरायाची सातव्या दिवशी व गावातील तरुण भजनी मंडळाचे पदाधिकारी प्रवीण पाटील विश्वनाथ पाटील भटू कोळी भाऊराव कोळी मनोज पाटील भगवान पाटील जयपाल गिरासे युवकांनी टाळ मृदुंग च्या तालावर गावात सोबत घेऊन गावात तसेच गौळण भजन तालावर युवावर्ग तिरकला व गावातून फुलांनी व विद्युत रोषनाईने सजविलेल्या ट्रॅक्टर गणरायाची मिरवणूक काढून कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने शांततेने व शिस्तीचे दर्शन घडवत गावा बाहेरील गाव विहिरीवर गणरायाचे विसर्जन करण्यात आले मंडळाचे श्याम पाटील मिलिंद पाटील चतुर पाटील दीपक गिरासे पंकज पाटील कल्पेश महाराज पिंटू खरखार विठोबा खरखर गंपू गिरासे भागवत गिरासे यांनी परिश्रम घेतले

