वाचक चळवळ वाढवण्यासाठी काही उपाय*
1 min read

वाचक चळवळ वाढवण्यासाठी काही उपाय*

Loading

*वाचक चळवळ वाढवण्यासाठी काही उपाय*

 

वाचक चळवळ वाढवण्यासाठी वाचन संस्कृती जोपासणे वाचकांना नियमित वाचनाचे सवय लावणे आणि वाचनाचे फायदे लोकांपर्यंत पोहोचवणे यासाठी महत्त्वाचे काही उपाय आहेत ज्यामुळे वाचन चळवळ वाढवण्यासाठी उपयोग होईल वाचक चळवळ वाढवण्यासाठी गावपातळी पासून शहरापर्यंत सार्वजनिक ग्रंथालय शालेय महाविद्यालयीन ग्रंथालय काम करत आहेत विविध विषयांवरील माहिती पुस्तके वृत्तपत्रे धार्मिक राज्यशास्त्र ऐतिहासिक ग्रंथाद्वारे वाचक वर्ग निर्माण करून तो टिकून ठेवण्याबरोबर वाचक वर्ग वाढवण्यासाठी जीकरीचे प्रयत्न व उपाय करत आहेत शासनस्तरावर विविध प्रकारचे धोरण राबवून वाचक वर्ग वाचनाकडे आकर्षित झाला पाहिजे म्हणून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत
*वाचक चळवळ वाढवण्यासाठी काही प्रमुख उपाय*
1) वाचकांना वाचन संस्कृती रुजवणे घरात आणि समाजात वाचनाचे महत्त्व वाढवणे आवश्यक आहे
2) वाचकांना नियमित वाचनाची सवय लावणे दिवसातील नियमित काही वेळ वाचनासाठी बाजूला काढणे जसे की 30-45 मिनिटे हे मेंदूला सक्रिय ठेवण्यास आणि स्मरणशक्ती सुधारण्यास मोठी मदत करते बौद्धिक पातळी वाढवण्यासाठी मदत होते
3) वाचनाचे फायदे समजावून सांगणे नियमित वाचनामुळे वाचकांची विचारशक्ती वाढते नवीन कल्पना मिळतात आणि व्यक्तिमत्व विकास होतो हे वाचकांना समजावून सांगणे महत्त्वाचे आहे
4) वाचकांमध्ये एकाग्रता वाढवणे वाचकांना नियमित वाचनासाठी एकाग्रता खूप महत्त्वाची आहे त्यासाठी प्राणायाम ध्यान आणि पुरेशी झोप घेणे यासारख्या गोष्टी उपयुक्त ठरू शकतात असे काही स्त्रोत म्हणतात
5) वाचकांसाठी वाचनाच्या विविध पद्धती वापरणे वाचण्यासाठी प्रकट वाचन विचार वाचन आणि संदर्भ वाचन समाज वाचन अभ्यास वाचन सारख्या विविध पद्धतीचा वापर करून वाचनाची गती आणि आकलन क्षमता वाढवता येते
6) वाचकांना अवांतर वाचनाला प्रोत्साहन देणे अभ्यासा व्यतिरिक्त इतर पुस्तके वाचल्याने नवीन विचार येतात आणि बुद्धीला चालना मिळते ज्यामुळे विचार करण्याची क्षमता वाढते विविध अनुभव वाचल्याने स्वतःला यशस्वी वाटचाल करता येते
7)वाचकांना सुलभ साहित्य उपलब्ध करणे, पुस्तके आणि इतर वाचन साहित्य सहज उपलब्ध व्हावे यासाठी शासनाने मुबलक अनुदान वाढवणे गरजेचे आहे त्यामुळे वाचकांना हवी असणारी विविध विषयांवरील वाचण साहित्य वाचकांना उपलब्ध करून देणे शक्य होईल त्याचबरोबर वाचणालय आणि ग्रंथालय यांची संख्या वाढवणे आवश्यक आहे
8) वाचकांच्या मेंदूत चालना देणारे उपक्रम राबवणे वाचण्या व्यतिरिक्त कोडी सोडवणे शब्दकोडी सोडवणे आणि बुद्धिबळासारखे खेळ खेळणे हे देखील स्मरणशक्ती वाढवण्यासाठी आणि मेंदूला सक्रीय ठेवण्यासाठी उपयुक्त ठरतात वाचनाची सवय शालेय जीवनापासून असतानाच लागली तर पुढे तो एक उत्तम वाचक होतो
वाचन कौशल्य वाढवण्यासाठी एकमेकांना पत्राद्वारे संपर्क करावा त्यामुळे वाचन संस्कृती वाढवण्यासाठी प्रोत्साहन मिळेल पत्र आणि शब्द जागरूकता वाढवण्यासाठी वैयक्तिक लिखित अक्षरे आणि शब्द ओळखण्यास त्यांना समजून घेण्यासाठी सर्व प्रकारच्या साहित्याला वाचणे गरजेचे आहे मुलाच्या भाषिक क्षमता विकसित होण्यासाठी व वाचन संस्कृती विकास होण्यासाठी महाराष्ट्र वाचन चळवळ हा उपक्रम हाती घेण्यात आला त्यातील एक महत्त्वाचा उपाय म्हणजे वाचन संस्कृती जोपासणे व वाढवणे वाचणे हा एक उत्तम छंद आहे वाचन वेगवेगळ्या भाषेत करता येते मातृभाषेतून केलेले वाचन वाचायला आणि समजायला सोपे जाते मराठीतून वाचन करण्यासाठी भरपूर साहित्य उपलब्ध आहे वाचनाने माणूस ज्ञानी होतो आणि त्याला पुस्तकांचे रूपाने एक मार्गदर्शक मित्र मिळतो महाराष्ट्रात वाचक व वाचन संस्कृती टिकून ठेवण्यासाठी ग्रामीण व शहरी भागात सार्वजनिक वाचनालय अतिशय प्रतिकूल परिस्थितीत अधिक चांगले काम करत आहेत वाचाल तर वाचाल शिकाल तरच टिकाल या बोध संदेशावर ग्रंथालय चळवळ कार्यरत आहे या चळवळीस राज्य शासनाने सक्षम करणे गरजेचे आहे

लेखक- श्री सतीश दशरथ पाटील
सदस्य महाराष्ट्र राज्य ग्रंथ निवड समिती मुंबई व जिल्हा अध्यक्ष सार्वजनिक ग्रंथालय संघ जळगाव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *