“खेळाडूंनी वजन कमी करून तंदुरुस्त व्हावे – डॉ. तुषार पाटील; शालेय क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न”
![]()
“खेळाडूंनी वजन कमी करून तंदुरुस्त व्हावे – डॉ. तुषार पाटील; शालेय क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न”
भुसावळ प्रतिनिधी- महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी अधिकारी कार्यालय जळगाव, पंचायत समिती शिक्षण विभाग भुसावळ यांच्याद्वारे ताप्ती पब्लिक स्कूल भुसावळ येथे शालेय शासकीय तालुकास्तरीय मुलांच्या 14, 17, 19, वर्ष वयोगटाच्या बॅडमिंटन स्पर्धा संपन्न झाल्या. सदर स्पर्धेचे उद्घाटन आंतरराष्ट्रीय धावपटू डॉ.तुषार पाटील यांच्या हस्ते मेजर ध्यानचंद त्यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून, श्रीफळ फोडून करण्यात आले. अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका निना कटलर हे होते. सदर प्रसंगी महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे राज्य उपाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष ,भुसावळ तालुका क्रीडा समन्वयक डॉ. प्रदीप साखरे, भुसावळ रन चे पदाधिकारी तथा सदस्य, प्रा. मनोज वारके, मेघश्याम शिंदे यांच्यासह सर्व क्रीडा शिक्षक खेळाडू प्रशिक्षक पंच उपस्थित होते सर्वप्रथम मान्यवरांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. प्रास्ताविकात डॉ. प्रदीप साखरे यांनी खेळाविषयी व स्पर्धेविषयी ची माहिती दिली. नंतर उद्घाटक डॉ. तुषार पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सहभागी खेळाडूंचे अभिनंदन केले. सततच्या बैठ्या अभ्यासामुळे व मोबाईल च्या अती वापरा मुळे व. सर्व खेळाडूंनी स्पर्धेत आपल्या खेळाचे कौशल्य दाखवून यश संपादन करावे. जिंकलेल्या संघांनी आपल्या तालुका जिल्हा राज्याचे नाव उंचावून राष्ट्रीय स्पर्धेपर्यंत कसे जाता येईल यासाठी प्रयत्न करावे. तालुक्याचे जिल्हास्तरावरती प्रतिनिधित
जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रतिनिधित्व करण्यासाठी व विजया साठी सर्वं खेळाडूंना व त्यांच्या प्रशिक्षकांना शुभेच्छा दिल्या . स्पर्धेचा निकाल खालील प्रमाणे. .14 वर्षातील मुलांमध्ये पब्लिक स्कूल ने विजय पद प्राप्त केले तर डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूल द्वितीय क्रमांक मिळवला. तर सेंट अलॉयसेस हायस्कूला ते क्रमांक वरती समाधान मानावे लागेल. १७ वर्षातील मुलांमध्ये डॉक्टर उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूल ने विजेतेपद प्राप्त केले.व द्वितीय क्रमांक ताप्ती पब्लिक स्कूलने मिळवला तर तर सेंट अलॉयसेस हायस्कूला ते क्रमांक वरती समाधान मानावे लागेल. 19 वर्ष वयोगटात पु.ओ.नाहाटा कॉलेज ने प्रथम क्रमांक पटकावला तर बियाणी पब्लिक स्कूल द्वितीय स्थानावर राहिली. पंच म्हणून विजय संकेत ,नम्रता , तौसीफ कुरेशी , दिपक बाविस्कर , काम पाहिले. स्पर्धा यशस्वीतेसाठी महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे तालुका पदाधिकारी व ताप्ती स्कूलचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. स्पर्धेचे सूत्रसंचालन आभार प्रदर्शन मेघेश्याम शिंदे यांनी केले.

