अमळनेरचा अभिमान! – श्री. प्रदीप रावण कंखरे MH-SET (Philosophy) परीक्षेत यशस्वी
1 min read

अमळनेरचा अभिमान! – श्री. प्रदीप रावण कंखरे MH-SET (Philosophy) परीक्षेत यशस्वी

Loading

अमळनेरचा अभिमान! – श्री. प्रदीप रावण कंखरे MH-SET (Philosophy) परीक्षेत यशस्वी

अमळनेर प्रतिनिधी │ (मराठी लाईव्ह न्युज नेटवर्क)

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत दि. 15 जून 2025 रोजी घेण्यात आलेल्या MH-SET परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, यात श्री. प्रदीप रावण कंखरे, उपशिक्षक, जिल्हा परिषद शाळा अंबारे, ता. अमळनेर यांनी तत्वज्ञान (Philosophy) विषयातून यश संपादन केले आहे.
श्री. कंखरे यांची ही तिसरी उल्लेखनीय कामगिरी आहे. यापूर्वी त्यांनी UGC-NET तसेच MH-SET (मराठी विषय) या दोन्ही परीक्षांमध्ये पात्रता मिळवली होती. शैक्षणिक क्षेत्रातील त्यांची अभ्यासू वृत्ती, जिद्द आणि विद्यार्थ्यांसाठीचे अखंड प्रयत्न यामुळे ते एक धडपडणारे व प्रेरणादायी शिक्षक म्हणून ओळखले जातात.
या यशाबद्दल त्यांचे मा. गटशिक्षणाधिकारी सो. श्री. रावसाहेब पाटील, मा. शिक्षण विस्तार अधिकारी सौ. कविता सुर्वे मॅडम, पंचायत समिती अमळनेरचे मा. केंद्रप्रमुख श्री. किरण शिसोदे, तसेच सो. केंद्र शाळा अंतुर्ली–रंजाणे, ता. अमळनेर यांच्यासह संपूर्ण शिक्षकवृंद, मित्रपरिवार व हितचिंतकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी सतत प्रयत्नशील राहणारे व अभ्यासाविषयी सकारात्मक दृष्टिकोन असलेले शिक्षक म्हणून श्री. प्रदीप कंखरे यांचा उल्लेखनीय सन्मान होत आहे.

(मराठी लाईव्ह न्युज नेटवर्कच्यावतीने  सरांचे  हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा!)

💐💐💐

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *