SET परीक्षेत सुवर्ण यश – सुवर्णा वाघ यांचे शैक्षणिक क्षेत्राला मोठे योगदान
![]()
SET परीक्षेत सुवर्ण यश – सुवर्णा वाघ यांचे शैक्षणिक क्षेत्राला मोठे योगदान
अमळनेर प्रतिनिधी
सौ. सुवर्णा श्रीकांत वाघ, प्राथमिक शिक्षक, जिल्हा परिषद धुळे या सहाय्यक प्राध्यापक पदासाठीची पात्रता परीक्षा SET परीक्षा ( जून 2025) , इंग्रजी विषयात 300 पैकी 176 मार्क्स (58.67%) गुण मिळवून पात्र (Qualified) झाल्या आहेत.
मागील वर्षी त्या शिक्षण सेवक म्हणून पवित्र पोर्टल मार्फत सेमी इंग्रजी शिक्षक म्हणून त्यांची निवड जिल्हा परिषद धुळे मध्ये झाली. त्या प्रताप महाविद्यालयाचे माजी उपप्राचार्य, इतिहास विभाग प्रमुख व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे इतिहास अभ्यास मंडळाचे माजी अध्यक्ष प्रोफेसर डॉ दत्तात्रय नामदेव वाघ व लोकमान्य शिक्षण मंडळाची नवीन मराठी शाळा येथील माजी शिक्षिका सौ.अरुणा दत्तात्रय वाघ यांच्या स्नुषा असून, धुळे येथील झेड बी पाटील महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापक श्रीकांत वाघ यांच्या पत्नी आहेत. कौटुंबिक जबाबदारी सांभाळत एम. ए इंग्रजी व बी.एड चे उच्च शिक्षण घेत विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाल्या असून CTET चे दोन्ही पेपर्स विज्ञान विषयासह प्रथम श्रेणीत, TET, TAIT परीक्षांमध्ये यश संपादन केले आहे. पुढे शैक्षणिक क्षेत्रात शिक्षण व संशोधन करण्याचा त्यांचा मानस आहे. उत्तम गुणांनी सेट परीक्षेतील त्यांच्या यशाबद्दल शिक्षणप्रेमी मान्यवरांनी अभिनंदन करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात.
धुळे जिल्हा परिषदेंतर्गत सन्माननीय अधिकारी वर्ग,माननीय प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. किरण जयप्रकाश कुंवर मॅडम, पंचायत समिती शिंदखेडा गटशिक्षणाधिकारी मा. श्री. डी. एस. सोनवणे सर व सर्व अधिकारी वर्ग, मा. मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर बंधू भगिनी यांनी कौतुक करून अभिनंदन केले.
इंग्रजी विभाग, एस.एस.व्ही.पी.एस कला व वाणिज्य महाविद्यालय धुळे, डी. डी. विसपुते शिक्षण शास्त्र महाविद्यालय, झेड. बी. पाटील महाविद्यालय,धुळे आणि
प्रताप महाविद्यालय,अमळनेर, या महाविद्यालयांमधील आदरणीय गुरूवर्य प्राध्यापक वर्ग यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. प्रा.सुधीर एस. पाटील, प्रा.डी.के.सैन्दाणे, प्रा. अनिल महाले यांच्यासह अनेक गुणग्राही मान्यवरांनी या यशाबद्दल अभिनंदन केले.

