जिल्ह्यातील उ.मा.वि./क.म.वि.शिक्षकांच्या एन.पी.एस.कपातीच्या रकमा त्वरीत खात्यात जमा करा. जुक्टो संघटनेची मागणी.
1 min read

जिल्ह्यातील उ.मा.वि./क.म.वि.शिक्षकांच्या एन.पी.एस.कपातीच्या रकमा त्वरीत खात्यात जमा करा. जुक्टो संघटनेची मागणी.

Loading

जिल्ह्यातील उ.मा.वि./क.म.वि.शिक्षकांच्या एन.पी.एस.कपातीच्या रकमा त्वरीत खात्यात जमा करा.
जुक्टो संघटनेची मागणी.

जळगांव: जिल्ह्यातील १ नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत दाखल झालेल्या उ.मा.वि./ क.म.वि.शिक्षकांच्या मासिक वेतनातून कपात झालेल्या एन.पी.एस.वर्गणीच्या रकमा तब्बल १ वर्ष उलटून गेले तरी अद्यापही त्यांच्या खात्यात जमा झालेल्या नसल्याने व वेतन पथक कार्यालयाकडे याबाबत वारंवार पाठपुरावा करूनही थातूरमातूर उत्तर देऊन बोळवण केली जात असल्याने जळगाव जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेने आक्रमक भूमिका घेत आज कार्यसम्राट पदवीधर आमदार आदरणीय श्री.सत्यजितदादा तांबे आज जळगांव महानगरात कौटुंबिक कार्यक्रमासाठी आले असता, महानगर कार्यकारिणीच्या वतीने त्यांची सदिच्छा भेट घेऊन या व इतर प्रलंबित न्याय्य समस्यांबाबत निवेदन देत वस्तुस्थिती कथन केली. जिल्ह्यातील उ.मा.वि./ क.म. वि.शिक्षकांच्या माहे ऑगस्ट २०२४च्या वेतनातून एन.पी. एस.ची वर्गणी कपात झालेली आहे. मात्र तब्बल १ वर्ष उलटून गेले तरी तसेच माहे जानेवारी ते मार्च २०२५ची कपात झालेली रक्कम अद्यापही संबंधितांच्या खात्यात जमा झालेली नाही. पुढील महिन्यात जिल्ह्यातील बरेच एन.पी.एस.धारक सेवानिवृत्त होत आहेत, त्यांना सदर जमा न झालेल्या रकमेमुळे एन.पी.एस.पेन्शन प्रस्ताव तयार करण्यास अडचण येतआहे, त्यातच वित्त विभागाने सदर कपातीच्या मिसिंग/क्रेडिट रकमेचा १० जुलै २०२५ रोजी जी.आर. काढलेला असल्याने रकमा जमा न झाल्याने त्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होणार आहे. तसेच २०१८- १९ पासून जिल्ह्यातील घड्याळी तासिका तत्वावरील शिक्षकांचे थकीत मानधन त्वरीत देण्यात यावे, मा.शिक्षण उपसंचालक कार्यालयाद्वारे टप्पा वाढीचे पत्र त्वरीत निर्गमित करण्यात यावे, पेन्शन विकल्पाविषयी व्यक्तिशः वित्त विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून अधिकृत माहिती देण्यासंदर्भात पाठपुरावा करावा अशा मागण्यांचे निवेदन प्रा.अनिता ओहळ (उपाध्यक्ष महानगर कार्यकारिणी) प्रा.छाया चौधरी, प्रा.महेंद्र राठोड (कार्यकारिणी सदस्य), प्रा.योगेश धनगर (महानगराध्यक्ष अंशतः अनुदानित संघटना) यांचेसह प्रा.सुनील गरुड (जेष्ठ मार्गदर्शक), डॉ.अतुल इंगळे (उपाध्यक्ष, जुक्टो संघटना) यांनी दिले. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष प्रा.नंदन वळिंकार यांनी भ्रमणध्वनी वरून आ.सत्यजित दादांशी चर्चा करून सदर समस्या त्वरीत निकाली काढण्याचे साकडे घातले. श्री.सत्यजित दादांनी याची दखल घेत तात्काळ वेतन पथक अधिक्षक मा.रियाज तडवी साहेबांना फोन करून लवकरात लवकर एन.पी.एस.कपातीच्या रकमा संबंधितांच्या खात्यात जमा करण्याबाबत आदेशित केले. यावेळी श्री.तडवी साहेबांनी सप्टेंबर अखेर सदर रकमा जमा होतील असा शब्द आमदार महोदयांना दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *