दादी प्रकाशमणींच्या पुण्यतिथीला अमळनेरात रक्तदानाचा महासागर भारत-नेपाळात रक्तदान महाअभियान – अमळनेरात ९२ पेक्षा जास्त रक्तदात्यांचा सहभाग
![]()
दादी प्रकाशमणींच्या पुण्यतिथीला अमळनेरात रक्तदानाचा महासागर
भारत-नेपाळात रक्तदान महाअभियान – अमळनेरात ९२ पेक्षा जास्त रक्तदात्यांचा सहभाग
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
ब्रह्माकुमारीज संस्थेच्या माजी मुख्य प्रशासिका राजयोगिनी दादी प्रकाशमणी यांच्या १८ व्या पुण्यतिथी व विश्वबंधुत्व दिनाच्या निमित्ताने ब्रह्माकुमारीज् एरंडोल सेवाकेंद्रात झालेल्या रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून ब्याण्णव पेक्षा जास्त रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे.
ब्रह्माकुमारीज संस्थेच्या माजी मुख्य प्रशासिका राजयोगिनी दादी प्रकाशमणी यांच्या १८ व्या पुण्यतिथी व विश्वबंधुत्व दिनाच्या निमित्ताने संस्थेतर्फे भारतासह नेपाळात रक्तदान महाअभियान शिबिर आयोजित केले गेले. या शिबिराद्वारे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड नोंदविण्यात येणार आहे. ब्रह्माकुमारीज् विद्यालय, अमळनेर मध्ये सकाळी शिबिराचे खासदार स्मीता ताई आमदार अनिलदादा पाटील, ब्रह्माकुमारी विद्या दीदी यांच्या शुभहस्ते उदघाटन करण्यात आले.
संतोष वाघ, अध्यक्ष, जीवनश्री ब्लड बँक, डॉ. बी. आर. बाविस्कर, रक्त संक्रमण अधिकारी, वेदांत कुळकर्णी, गौरव पालीवाल, टेक्निशियन, ॲङ तिलोत्तमा पाटील, रंजना दीदी, आरती दीदी, वैष्णवीदीदी, सुषमादीदी, हरचंद लांडगे, धनंजय सोनवणे, प्रेमराज सुर्यवंशी, जितू लाड, मोराणकर सर, प्रमोद सोनवणे यांचे सहकार्य लाभले. याप्रसंगी जीवनश्री ब्लड बँक तर्फे ब्रह्माकुमारी विद्यालयाने राबविलेल्या या शिबिराबद्दल विद्यादीदी यांना सन्मानित केले.
देशभरात एक लाखापेक्षा जास्त रक्तदात्यांनी रक्तदान करण्याचे उदिष्ठ आहे. तीन दिवस चालेल्या या शिबिरात भारत आणि नेपाळ सहित ब्रह्माकुमारीज् सेवाकेंद्राच्या माध्यमातून झालेल्या रक्तदान शिबिरातून ग्रिनिज बुक ऑफ रेकॉर्ड होणार असल्याचे डॉ. सोमनाथ वडनेरे, महाराष्ट्र राज्य मीडिया कॉर्डिनेटर, मीडिया प्रभाग माऊंट आबू यांनी सांगितले.


