अमळनेरातील अनेकांचा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात प्रवेश  सामाजिक कार्यकर्ते हेमंत पवार, संतोष लोहरे व मार्केट संचालक नितीन पाटील यांचा समावेश
1 min read

अमळनेरातील अनेकांचा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात प्रवेश सामाजिक कार्यकर्ते हेमंत पवार, संतोष लोहरे व मार्केट संचालक नितीन पाटील यांचा समावेश

Loading

अमळनेरातील अनेकांचा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात प्रवेश

सामाजिक कार्यकर्ते हेमंत पवार, संतोष लोहरे व मार्केट संचालक नितीन पाटील यांचा समावेश

अमळनेर-शहर व तालुक्यातील काही राजकीय पदाधिकाऱ्यांनी माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला.
यात अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा गडखांब सरपंच नितीन खुशाल पाटील शहरातील बिल्डर तथा सामाजिक कार्यकर्ते हेमंत पवार व गांधलीपुरा भागातील सामाजिक कार्यकर्ते संतोष लोहरे आदींचा समावेश आहे. जळगाव येथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मेळाव्यात पक्षाचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री ना. अजित दादा पवार यांनी पक्षात त्यांचे स्वागत केले.दरम्यान नितीन पाटील हे बाजार समितीचे माजी सभापती बापूराव खुशाल पाटील यांचे सुपुत्र असून प्रथमच बाजार समितीत संचालक म्हणून ते विजयी झाले आहेत.तसेच हेमंत पवार हे प्रसिद्ध बिल्डर असून सामाजिक व राजकीय कार्यात ते सक्रिय आहेत.तसेच संतोष लोहरे हे माजी नगरसेविका श्रीमती मायाबाई लोहरे यांचे सुपुत्र असून गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात ते सक्रिय आहेत.त्यांच्या मातोश्री आमदार शिरिषदादा मित्र परिवाराच्या नगरसेविका असताना त्यानी त्या गटाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.लवकरच अजून अनेक मातब्बरांचे प्रवेश आगामी काळात होण्याचे संकेत मिळाले असून आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या दृष्टीने हे प्रवेश राष्ट्रवादी काँग्रेसला बळकटी देणारे ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *