डिजिटल युगातील नवा ग्रंथपाल –,माहितीचा खरा दिशा-दर्शक-सतीश पाटील  सदस्य सहाय्यक राज्य ग्रंथ निवड समिती मुंबई
1 min read

डिजिटल युगातील नवा ग्रंथपाल –,माहितीचा खरा दिशा-दर्शक-सतीश पाटील सदस्य सहाय्यक राज्य ग्रंथ निवड समिती मुंबई

Loading

डिजिटल युगातील नवा ग्रंथपाल –माहितीचा खरा दिशा-दर्शक-सतीश पाटील सदस्य सहाय्यक राज्य ग्रंथ निवड समिती मुंबई

अमळनेर प्रतिनिधी
आपण दिनांक 12 ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय ग्रंथपाल दिन म्हणून साजरा करतो या दिवशी आपण भारतीय ग्रंथालय चळवळीचे जनक डॉक्टर एस आर रगनाथन् यांचे स्मरण करतो वाचकांसाठी प्रत्येक पुस्तके पुस्तकांसाठी वाचक पुस्तकांचे जतन वाचनालय् ग्रंथालय ही वाढवणारी संस्था आहे ही आपल्याला त्यांनी दिलेली पाचही सूत्रे आजही माहितीचा युगात ज्ञान व्यवस्थापनासाठी समर्पक ठरतात ग्रंथापालाचा बदलता चेहरा नव्या भूमिका आणि वाचन संस्कृती माहिती संवर्धनासाठी आवश्यक वाटचाल यावर लक्ष केंद्रित केले पहिजे
कोणत्याही शैक्षणिक वातावरणात आपण पहात असतो की ग्रंथपाल या शैक्षणिक वातावरणात या मुलांसाठी किती ज्ञान सेतू आहे चार भिंतीच्या मध्ये ग्रंथपाल हा ज्ञानाची शिदोरी देण्याची काटेखोरपणे व्यवस्था करत असतो ग्रंथालय म्हणजे ज्ञानाच्या सागरात डुबण्याचे प्रवेशदार असते म्हणजे तेथे पुस्तके ज्ञानाबरोबर मनोरंजनात्मक प्रेरणादायी साहित्य असते बाल वयात रुजवलेली वाचनाची संधीही विद्यार्थ्यांना व्यक्ती महत्त्वाचा विकासात मोलाची भूमिका बजावते ही वाचनाची सवय एक यशस्वी व्यक्ती घडवते पुस्तके ही नुसती माहिती देत नाही ती जीवनाच्या दृष्टिकोन घडवतात एक चांगल्या पुस्तकामुळे विद्यार्थी संवेदनशील विचारशील आणि आत्मज्ञान असलेला नागरिक बनतो
राष्ट्रीय शिक्षण धोरण या नव्या शैक्षणिक धोरणात विद्यार्थ्यांमध्ये वाचन सवयी रुजवण्यावर भर दिला गेला आहे त्यासाठी प्रत्येक शाळेत स्वच्छ ग्रंथालय असावे हे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे अलीकडेच संबंधित असलेला वाचन संकल्प महाराष्ट्र अशा उपक्रमातून विद्यार्थी वाचनाबरोबर निबंध लेखन कथाकथन अशा अनेक विविध स्पर्धांचे आयोजनामुळे एक सुदृढ वाचन पिढी घडवण्या कडे शासकीय शिक्षण आराखड्याचे धोरण स्पष्ट आहे भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालय विभागाने शालेय विद्यार्थ्याकरिता स्टोरी प्रथम बुक्स आणि नॅशनल डिजिटल लायब्ररी या पोर्टलवर प्रचंड मोठा वाचन साठा मोफत स्वरूपात उपलब्ध करून दिलेला आहे
पूर्वी ग्रंथपाल म्हणजे पुस्तकांची यादी ठेवणारा शांतता राखणारा आणि पुस्तके देणारा कर्मचारी होता पण डिजिटल युगात ग्रंथपाल माहितीचा व्यवस्थापक शोधतज्ञ संशोधन सल्लागार वाचनपचार देणारा मार्गदर्शक बनला विद्यार्थ्यांसाठी योग्य माहिती निवडणे संशोधनासाठी मार्गदर्शन करणे इत्यादी रिसोर्सेस सहज उपलब्ध करून देणे हे सर्व काम ग्रंथपाल करत असतो त्यामुळे तो एक नॉलेज नेव्हीगेटर ठरत आहे सध्या भारतात डिजिटल इंडिया कॅम्प अंतर्गत अनेक शाळा महाविद्यालय मध्य ग्रंथालयाचे दिजितायझेशन सुरू आहे
ग्रंथपालाकडून तुम्हाला योग्य माहितीचे दिशा मिळते शिक्षकासारखा ग्रंथपाल विद्यार्थ्यांच्या आयुष्यात शब्दाशिवाय शिकवण देणारा शिक्षक पालकांनी मिळून वाचन् संस्कृती वाढवावी आणि ग्रंथपालाला सन्मान द्यावा शेवटी पुस्तकांशी मैत्री करणारी मुलेच ज्ञान समृद्ध भारताची उभारणी करतील

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *