1 min read

अखिल भारतीय माळी महासंघातर्फे होणार धुळे शहर व धुळे तालुक्यातील गुणवंतांचा सत्कार 

Loading

अखिल भारतीय माळी महासंघातर्फे होणार धुळे शहर व धुळे तालुक्यातील गुणवंतांचा सत्कार

धुळे प्रतिनिधी(काशिनाथ माळी सर)

सालाबाद प्रमाणे यंदाही इयत्ता दहावी, बारावी, डिप्लोमा ,पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमात तसेच स्पर्धा परीक्षा मार्फत नियुक्त झालेल्या माळी समाजातील सर्व पोट जातीतील धुळे शहर व तालुक्यातील गुणवंतांचा सत्कार कल्याण भवन, शिवतीर्थ जवळ धुळे ,येथे दिनांक 31आँगस्ट2025 रोजी सकाळी 10 वाजता करण्यात येणार आहे. त्यासाठी इयत्ता दहावी मध्ये 85 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळवणारे विद्यार्थी, इयत्ता बारावी मध्ये 70 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळवणारे विद्यार्थी ,तसेच पदविका, पदवी, पदव्युत्तर इंजिनियर अभ्यासक्रम यामध्ये 7.5 सीजीपीए किंवा त्यापेक्षा जास्त परसेंटाइल प्राप्त करणारे विद्यार्थी, MPSC UPSC व स्पर्धा परीक्षेतील यशस्वी गुणवंताचा व नवनियुक्ती कर्मचारी अधिकारी यांचा सत्कार करण्यात येणार आहे. त्यासाठी सर्व इच्छुकांनी आपल्या गुणपत्रिका ची झेरॉक्स प्रत त्यावर आपला मोबाईल क्रमांक लिहून दिनांक 25 ऑगस्ट 2025 पर्यंत श्री विलासराव पाटील ‘ श्री हरिश्चंद्र रेंडे 9421886532,श्री. जितेंद्र माळी9527439103, श्री काशिनाथ माळी सर7972693773 श्री राजेंद्र माळी9657538477, श्री राजेंद्र गवळे सावता फुल भांडार9822772692 श्री संदीप माळी सर9503960587,श्री. किशोर माळी सर9403434883 श्री सुनील माळी9145555896, श्री अनिल वाघ9422961973, श्री अनिल बिरारी7875378644, श्री ज्ञानेश्वर माळी9421617841 सर्व रा.धुळे तसेच सुनील माळी वरखेडी,रवींद्र माळी दोंदवाड, सुदाम माळी लामकानी, मनीष माळी साई देवा फोटो स्टुडिओ नेर, जिजाबराव माळी सर .,संजय शिवराम माळी सोनगीर, मनोज अहिरे सर बोरकुंड, कैलास रोकडे न्याहळोद,रोहित सोनवणे सर बोरीस यांच्याकडे जमा करावेत . तसेच कार्यक्रम स्थळी सर्वांना जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे दि २५ ऑगस्ट २०२५ नंतर उशिरा आलेल्या गुणपत्रिकेचा विचार केला जाणार नाही. तरी सर्व इच्छुकांनी जास्तीत जास्त .संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष श्री आर के दादा माळी ,धुळे तालुकाध्यक्ष व महानगर अध्यक्ष श्री हरिश्चंद्र रेंडे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *