आशा स्वयंसेविकांच्या मागण्यांवर वैद्यकीय अधिकारी यांच्याशी आशा युनियनचे रामकृष्ण बी.पाटील यांनी केली चर्चा
![]()
आशा स्वयंसेविकांच्या मागण्यांवर वैद्यकीय अधिकारी यांच्याशी आशा युनियनचे रामकृष्ण बी.पाटील यांनी केली चर्चा
धुळे प्रतिनिधी
धुळे महानगरपालिका अतंर्गत काम करणाऱ्या आशा सेविकांना दरमहा थकित मानधन द्यावे,जुलै 2020 पासून आरोग्यवर्धीनी टीम बेसच्या कामाचा थकित मोबदला अदा करावा, व्हाउचरवर वेळेवर सह्या न देणाऱ्या ANM वर कारवाई करावी,कृष्ण नगर UPHC त लावण्यात येत असलेल्या ड्यूटी रद्द करण्यात यावी, आशाताईंना दरमहा वेतन चिठ्ठी देण्यात यावी, ऑनलाईन कामाची सक्ती थांबवावी,आभा कार्ड, कुष्ठरोग सर्व्हे,NCD च्या कामाची रक्कम,मातृवंदन योजनेच्या कामाचे थकीत मानधन अदा करावे,जियो टॅगच्या फोटोची सक्ती बंद करावी,वॅक्सिन कॅरीयर ने-आण ची सक्ती बंद करावी,एकल महिला सर्व्हेचे देणे बंद करावे. शासन नियमानुसार दरमहा शंभर रुपयाऐवजी 300/- रुपये मोबाईल रिचार्जची रक्कम अदा करावी.
यासह अन्य मागण्यांवर चर्चा करण्यासाठी युनियन प्रतिनिधींबरोबर बैठक आयोजित करावी अशा आशयाचे पत्र युनियनने दि. 10.08.2026 आणि दि. 18.08.2026 रोजी महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी यांना दिले होते.
त्याअनुषंगाने आज 4.00 वाजेपासून वैद्यकीय अधिकारी यांच्या दालनात सुमारे दोन तास बैठक होऊन सविस्तर चर्चा झाली.
सदर चर्चेत राज्य शासनाचे मानधन अदा झाले असून केंद्राच्या मानधनाचा निधी आल्यावर लगेच अदा केले जाईल,आरोग्य वर्धिनीच्या कामाचा मोबदला लवकरच अदा केला जाईल,येत्या महिन्यापासून आशा सेविकांना दरमहा वेतन चिठ्ठी देण्यात येईल,आशांच्या कामाच्या व्हाउचरवर सह्या करण्यासाठी आठवड्यातून एक दिवस ठरविण्यात येईल, कृष्ण नगर UPHC तील आशा सेविकांच्या ड्यूटी रद्द करण्यात येतील,कामाच्या थकित मोबदल्यासाठी वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा केला जाईल,आरोग्याच्या कामाव्यतिरिक्त आशाताईंना कोणतेही ऑनलाईन काम दिले जाणार नाही,कामाच्या व्हाउचरला जियो टॅगच्या फोटो प्रिंट न लावता आशाताईंनी फक्त मोबाईल मध्ये फोटो काढून ठेवावा, आशाताईंना वॅक्सिन कॅरीयर ने-आण करण्याची सक्ती नसून ऐच्छिक राहील, मोबाईल रिचार्जच्या रकमेचा फरक लवकरच अदा केला जाईल,एकल महिला सर्व्हेच्या कामाबाबत पुनर्विचार करण्यात येईल. असे वैद्यकीय अधिकारी डॉ.महेश मोरे यांनी चर्चा करतांना सांगितले.

