ज्ञान, सेवा आणि समाजकारणाचा त्रिवेणी संगम  विजय जगन्नाथ बोरसे यांचा मराठी वाड्‌मय मंडळात मानाचा सत्कार!
1 min read

ज्ञान, सेवा आणि समाजकारणाचा त्रिवेणी संगम विजय जगन्नाथ बोरसे यांचा मराठी वाड्‌मय मंडळात मानाचा सत्कार!

Loading

ज्ञान, सेवा आणि समाजकारणाचा त्रिवेणी संगम

विजय जगन्नाथ बोरसे यांचा मराठी वाड्‌मय मंडळात मानाचा सत्कार!

अमळनेर प्रतिनिधी :
शिक्षणातून ज्ञानाची कास धरून बँकिंग क्षेत्रात (SBI) तब्बल 34 वर्षे प्रामाणिक सेवा बजावणारे, निवृत्तीनंतरही अर्बन बँकेत तज्ञ सल्लागार म्हणून योगदान देत असलेले, समाजकार्यात नेहमी पुढाकार घेणारे अशी बहुमुखी ओळख असलेले आदरणीय विजय जगन्नाथ बोरसे आबा यांचा मराठी वाड्‌मय मंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत दिनांक 20 ऑगस्ट 2025 रोजी सन्मान करण्यात आला.
97 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात उत्कृष्ट हिशेबनीस म्हणून लौकिक प्राप्त केलेल्या बोरसे आबांचा मानाचा सत्कार होणे हे मंडळासाठीही अभिमानाची बाब ठरली.
या वेळी मराठी वाङ्मय मंडळाचे अध्यक्ष डॉ. अविनाश जोशी यांच्यासह सर्व संचालक मंडळ मान्यवर उपस्थित होते.
“ज्ञान, सेवा आणि समाजकारण” या त्रिवेणी संगमाचे प्रतीक ठरलेल्या या सत्कारामुळे मंडळाचेही नाव उंचावले असल्याची भावना या प्रसंगी व्यक्त करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *